सावद्यातील गुटका माफिया सुरेश कुमार अमरनानी अखेर गवसला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या जाळ्यात!
“सावदा न.पा.हद्दीतील शहराच्या मुख्य हमरस्त्यावरील बेकायदेशीर इमारतीच्या अवैध तळघरात ३ लाखाच्यावर किमतीचे निघाले घबाड विमल गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ शहरातील विविध गुटखा विक्रेत्यांवर मध्ये उडाली खळबळ.”
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे लखन ट्रेडर्स या नावाने प्रसिद्ध दुकान ठिकाणी जळगांव येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता राज्यात बंदी असलेला विमल गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ दुकानाच्या तळघरातील मोठ्या प्रमाणात सापडलेला अवैध साठा हा गुटखा तस्करासह भाडयाचे वाहनाने सावदा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुर्गामाता चौकातील सरदार वल्लभ भाई पटेल संकुल समोरील इमारतीत लखन ट्रेडर्स या नावाने महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या अवैद्य गुटखा तस्करीच्या असलेले हा केंद्र रावेर यावल परिसरात सुप्रसिद्ध आहे. याबाबत वेळोवेळी बातम्या देखील प्रसिद्ध झालेले असून अखेर त्या तक्रारदाराला या अनुषंगाने न्याय मिळाला.
सदरील छापा टाकण्या कामी आलेले अन्न प्रशासन विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारीवर्ग गट ब आर एम भरकट,व किशोर साळुंखे यांनी मोलाची भूमिका बजावून सदरील अवैध तळघरातून जवळपास ३ लाख ६३ हजार ७४९ रुपये किमतीचा अवैद्य विमल गुटखा सह तंबाखूजन्य पदार्थ पकडून मोठी कौतुकास्पद कारवाई केलेली आहे. याबाबत लखन ट्रेडर्सचे मालक व गुटखा तस्कर सुरेश कुमार दीपचंद अमरनानी यांच्याविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात अन्न भेसळ प्रतिबंध कायदया सह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र सदर अधिकाऱ्यांनी पुन्हा १ ते २ महिन्यात अचानक पणे टाकल्यास शहरात अवैध गुटखा तस्कर मुद्देमालासह सापडतील हे मात्र खरे आहे.
तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यात बंदी असलेला विमल गुटखा तंबाखूजन्य पदार्थ लखन ट्रेडर्सचे मालक सुरेश कुमार दिपचंद अमरनाणी या तस्करांनी हा माल कुठून आणला? या दिशेने सावदा येथील कर्तव्यदक्ष एपीआय डी डी इंगोले यांनी योग्य तपास करून अवैध गुटखा विक्रीचा गोरख धंदा करणाऱ्या तस्करांचा शोध लावून पितळ उघडे करावे.






