Amalner

नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड संपूर्ण परिवारास पुरेल अश्या फूड पॅकेटचे वाटप..

नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड

संपूर्ण परिवारास पुरेल अश्या फूड पॅकेटचे वाटप..

अमळनेर-प्रभागाच्या हितासाठी सतत क्रियाशील राहून नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबविणाऱ्या नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी दिवाळीनिमित्त आपल्या प्रभागातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या मिठाई आणि फरसाण असलेले मोठे फूड पॅकेट देऊन त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली.
“देईल तर मनापासून आणि करेल तेही मनापासून” अशी विचारधारा आधीपासूनच नरेंद्र चौधरी यांची असल्याने त्यांनी कोणतेही कार्य करताना कधीही आखडता हात घेतलेला नाही यामुळेच दिलदार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने जे सफाई कामगार आपल्या प्रभागात सतत वर्षभर वर्षभर ऊन वारा व पावसाची तमाम बाळगता पुरेशी मेहनत घेऊन स्वच्छतेचे महान कार्य करतात आणि नागरिकांचे आरोग्य निरोगी राखण्याचा प्रयत्न करतात त्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी मिठाईचे नामांकित कंपनीचे मोठे फूड पॅकेट पाडव्याच्या दिवशी एका छोटेखानी सोहळ्यात सर्व सफाई कर्मचारी, लाईट विभागाचे कर्मचारी,प्रभाग मुकादम इ ना वाटप केले.सदर फूड पॅकेट मध्ये गुलाब जाम, रसगुल्ला,भुजिया शेव,फरसाण,ऑरेंज सोन पापडी,याशिवाय अजून काही पदार्थांचा समावेश असल्याने हे मोठे फूड पॅकेट संपूर्ण परिवाराची दिवाळी गोड करणार आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र चौधरी यांनी पुन्हा एकदा आपला मनाचा दिलदारपणा सिद्ध केल्याची भावना सर्व सफाई कर्मचारी आणि प्रभागाच्या नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान प्रभाग एक मध्ये नरेंद्र चौधरी दुसऱ्यांदा उमेदवारी करणार असून मागील टर्मला त्यांच्या पत्नी सौ भारती चौधरी या नगराध्यक्षा होत्या.विकास कामासोबतच आपल्या त्यांनी प्रभागात टंचाई काळात घरपोच पाणी देण्याची मोठी मोहीम,कोविड परिस्थितीत रोजगार गमावलेल्याना मोठे फूड पॅकेट,अन्नदान असे अनेक उपक्रम राबवून आपण खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक असल्याचे दाखवून दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button