Amalner

डांगरी येथील रहिवासी उपक्रमशील शिक्षक ललित पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..!

डांगरी येथील रहिवासी उपक्रमशील शिक्षक ललित पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..!

अमळनेर(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. वसंतराव डावखरे साहेब यांच्या स्मरणार्थ भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागातर्फे दिला जाणारा यंदाचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील रहिवासी व पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील नेहरोली येथे शारदा विद्यालयात कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक ललित उत्तमराव पाटील यांना जाहीर झाला आहे. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.
दि.१३नोव्हेंबर रोजी ठाणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण केले जाईल. ललित पाटील हे उत्तम वक्ते, कवीलेखक,मराठी भाषेचे तज्ज्ञ मार्गदर्शक असून पुणे येथील बालभारतीचे मराठी भाषा राज्य अभ्यास मंडळाचे सदस्य व अध्यापनात नवनवीन प्रयोग करणारे उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button