sawada

संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध? सावद्यात ठराविक वेळेत केला जात आहे बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा!

संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध? सावद्यात ठराविक वेळेत केला जात आहे बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा!

” अर्थपूर्ण संबंधामुळे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.याकडे जाणीवपूर्वक रित्या कानाडोळा म्हणूनच शेखर लोहार कडून दररोज रात्रभर हजारो लिटर अवैध बायोडिझेलची विक्री करून मोठी आर्थिक कमाई करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा ”

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे रावेर रोड वरील कोणतीच सरकारी परवानगी नसताना फक्त संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंधामुळे कायद्याचा कोणतच धाक न बाळगता यंत्रणेच्या झोपण्याच्या वेळेत व जागी होण्याच्या आधी म्हणजे रात्रीपासून ते सकाळपर्यंत नियोजनबद्ध पणे या ठराविक वेळेत हजारो लिटर अवैध बायोडिझेलची सर्रासपणे विक्री करून मोठी आर्थिक कमाई करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

अवैध बायोडिझेल विक्रीचा प्रकार बहुचर्चित बनलेला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी याबाबत संबंधित यंत्रणेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून मोठ्या कारवाया होताना दिसत आहे.मात्र रावेर तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात हा गोरख धंदा सावदा येथे रावेर रोड वरील महिंद्रा धाबा व होटेल कुंदनच्या दरम्यान असलेल्या ठिकाणावर शेखर लोहार हा व्यक्ती डीजल टंकीत बायोडिझेलचा साठा ठेवून दररोज रात्री ८-३० पासून ते सकाळ पर्यंत (क्याना) द्वारे अवैधरित्या बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा संपूर्ण लाईट बंद ठेवून अंधारात राजरोसपणे चालवू मोठी आर्थिक कमाई करून मोकळा होऊन जातो.मात्र अवैध बायोडिझेल मुळे काही अनुचित प्रकार झाल्यास शेजारी असलेल्या खानावळ धाबा व हॉटेल सह येथे जेवणासाठी आलेले ग्राहकांचे काही बरेवाईट झाले तर यास जबाबदार कोण? हा चिंताजनक प्रश्न उपस्थित झालेला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी फैजपूर रोड लागत एका नामवंत ट्रान्सपोर्टच्या मागे भाड्याची जागेत सुरू असलेले झुलेलाल बायोडीजल पंप मालक वर रावेर तहसीलदार यांनी कारवाई करून पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे.मात्र तेव्हापासून ते आजतागायत सावदा येथे रावेर रोड वरील अवैधरित्या दररोज नियोजनबद्ध पणे ठराविक वेळेत हजारो लिटर बायोडिझेलचा विक्रीचा गोरख धंदा करणारे शेखर लोहार याच्याविरुद्ध रावेर तहसीलदार कडून साधी कारवाई देखील न होने बरेच काही सांगून जात आहे. तसेच सदर प्रकरणी याआधी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार यांनी देखील फैजपूर उपविभागीय अधिकारी यांची समक्ष भेट घेऊन रावेर तहसीलदार यांची भूमिका बद्दल संशया घेऊन नाराजी व्यक्त केलेली आहे.

तरी याकडे वरिष्ठ अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी सह उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे पथकाची नेमणूक करून अचानक पणे सदर ठिकाणी छापा टाकल्यास दूध का दूध पानी का पानी झाल्याशिवाय राहणार नाही.हे मात्र खरे आहे. तरीही या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याकडे लक्ष दिले जाणार नाही.तर “संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध? सावद्यात ठराविक वेळेत केला जात आहे अवैध बायोडिझेल विक्रीचा गोरख धंदा” असे म्हटल्यास त्यात काही गैर वाटण्यासारखे नाही. हे मात्र खरे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button