Amalner

अखेर बातम्या झळकल्या नंतर प्रताप झाले जागे..गुणवंतांचा केला सत्कार..

अखेर बातम्या झळकल्या नंतर प्रताप झाले जागे..गुणवंतांचा केला सत्कार..
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात विविध स्पर्धात यश मिळवून राज्य व देशभर ‘प्रताप’ गाजविणाऱ्या, विविध चषक, ढाल व सुवर्ण पदक आणणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांना आज खा.शी. मंडळ कार्याध्यक्ष यांचे कार्यालयात बोलावून त्यांचा उचित गौरव करण्यात आला.मान्यवरांचे हस्ते यशवंत, गुणी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, संचालक हरी भिका वाणी, प्रदीप अग्रवाल, डॉ संदेश गुजराथी, प्र.प्राचार्य डॉ पी आर शिरोडे, प्रा डॉ रमेश माने, प्रा.डॉ संदीप नेरकर, प्रा नितीन पाटील, प्रा डॉ विजय तुंटे, प्रा सचिन पाटील आदी उपस्थित होते.
यासंदर्भात ठोस प्रहार आणि लोक हितवादी ने बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रताप ला जाग आली आणि लाज देखील वाटली.परिणामी आज आत्ता ताबडतोब असे म्हणत प्रताप च्या संस्था चालक मंडळ आणि प्राचार्य यांनी गुणी विद्यार्थ्यांना बोलवून त्यांचा सत्कार केला.विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button