India

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि धर्म परिवर्तन…का निवडला बौद्ध धर्म..!

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि धर्म परिवर्तन…का निवडला बौद्ध धर्म..!

आज धर्मचक्र परिवर्तन दिन..आजच्या दिवशी 14 ऑक्टोबर1956 रोजी नागपूर येथे दिक्षा भूमी वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लाखो अनुयायांनी यावेळी धर्म परिवर्तन केले.समाजातील दलित वंचित घटकांची गरिबी,अज्ञान आणि सामाजिक अन्याय सुटका व्हावी आणि त्यांना आत्मसन्मानाने जगता यावं यासाठी स्वातंत्रपूर्व काळापासून चळवळ उभारून संघर्ष करत हक्कांची मांडणी केली होती.धम्म चक्र परिवर्तन दिन हा भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात महत्वपूर्ण दिवस होता.आज ह्या घटने संदर्भात काही गोष्टी जाणून घेऊ या..अनेकांना हा प्रश्न पडला असेल की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा च का स्विकार केला..हा निर्णय अचानक का घेतला..?तसेच नागपूर च का निवडण्यात आले..? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो.

पण हा निर्णय अचानक घेण्यात आला नव्ह्ता तर धर्म बदलविण्याच्या सुमारे चार महिने आधीपासून २४ मे १९५६ रोजी मुंबईच्या नरे पार्कवरील बुद्धजयंतीच्या समारंभातच त्यांनी ऑक्टोबर महिन्यात आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहोत अशी घोषणा केलेली होती.

त्या दृष्टीने सर्व नियोजन करून २३ सप्टेंबर १९५६ रोजी एक पत्रक प्रसिद्ध करून नागपूर येथे १४ ऑक्टोबर म्हणजे विजयादशमीच्या दिवशी आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याचं घोषित केलेलं होतं.त्यामुळे
नागपूर ही बौद्धधर्मीय नागलोक यांची प्राचीनकालची पूण्यभूमी आहे आणि बौद्धधर्माचं चक्र पुन्हा गतिमान करण्यासाठी तेच ठिकाण योग्य राहील या हेतूने त्यांनी या धर्मांतराच्या सोहळ्यासाठी नागपूर हे ठिकाण जाणीवपूर्वक निवडलं होतं.

बौद्ध धर्मात प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्व महत्वपूर्ण आहेत.माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क बौद्ध धर्म देतो असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते.
या सोहळ्याच्या आधीच्या दिवशी म्हणजे १३ ऑक्टोबर १९५६ या दिवशी वृत्तपत्र-प्रतिनिधींना बोलावून पत्रकार परिषदेत बौद्ध धर्म स्वीकारामागील आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती.त्यांच्या मते आम्ही आपलं मनुष्यपण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.आणि ते फक्त बौद्ध धर्म च आम्हाला देऊ शकेल.

एकंदरीत अत्यंत विचारपूर्वक नियोजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुसीनारा येथील महास्थविर चंद्रमणी या वयोवृद्ध भिक्षू यांच्या कडून आंबेडकर यांनी विधिवत दीक्षा घेतली.
बौद्ध धर्मस्वीकाराच्या सोहळ्यासाठी भव्य सभामंडप उभारण्यात आला होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी सविताबाई आणि सहाध्यायी रट्टू पांढरं रेशमी धोतर, पांढरा सदरा आणि वर पांढरा लांब कोट असा पेहराव करून दीक्षाभूमी वर प्रवेश केला होता. आणि अवघ्या पाऊण तासात हा सोहळा संपन्न झाला.

मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे .असे बाबासाहेब आंबेडकर

धर्मातर करताना त्यांच्या समोर मुस्लिम, ख्रिश्चन व इतर अनेक धर्म होते. पण बाबासाहेबांनी समाज प्रबोधन, माणसाला माणूस म्हणून अधिकार देणारा, तत्त्वज्ञानाची किनार असलेला धर्म हवा होता.म्हणून त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली.
धर्मांतराच्या निर्णया पासून ते धर्मांतर करेपर्यंत आंबेडकरांवर विविध प्रकारच्या टीका झाल्या. पण त्यांनी न जुमानता आपला निर्णय आणि कृती पूर्ण केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button