सेक्स करताना कंडोम न वापरल्यास होईल गुन्हा दाखल..!ह्या राज्याने घेतला मोठा निर्णय..!
सेक्स करणे आणि कंडोम वापरणे ह्या गोष्टी खूप व्यक्तिगत आहेत. वैयक्तिक गोष्ट ..सेक्स करताना कंडोम वापरायचा की नाही हे ठरवण्याचा निर्णय देखील तितकाच व्यक्तिगत.. पण आता हा विषय कायद्याअंतर्गत आला आहे त्यामुळे आता कायद्यानुसराच कंडोमचा वापर करावा लागणार आहे. पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढून टाकल्यास आता गुन्हा दाखल होणार आहे.
स्टील्थिंग म्हणजे बऱ्याच वेळा पुरुष सेक्स करताना त्याच्या पार्टनर च्या संमतीशिवाय कंडोम काढून टाकतो.याला अनेक कारणे असू शकतात त्यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पुरुषांना कंडोमचा वापर करून सेक्स करताना पाहिजे त्या प्रमाणात आंनद मिळत नाही, काही वेळा कंडोम फाटते अश्या परिस्थितीत पुरुष कंडोम काढून टाकतो.परिणामी महिला तिच्या मनाविरुद्ध गरोदर होण्याची शक्यता असतेच. तसेच कित्येक लैंगिक आजारही होण्याची भीतीही असते .
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात याविरुद्ध कायदा लागू करण्यात आला आहे.जगात हे पहिले राज्य आहे की ज्यांनी हा कायदा केला आहे. त्यामुळे आता पार्टनरच्या सहमतीशिवाय कंडोम काढून टाकले तर आरोपीवर कायदेशीर कारवाई होईल.
या विधेयकानुसार एखाद्या व्यक्तीने आपल्या पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. यानंतर पीडित व्यक्ती आरोपीकडून नुकसानभरपाई मिळवू शकते. अर्थात आरोपीसाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद या विधेयकात नाही. अर्थात यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी याच समर्थन केले आहे आणि यात शिक्षेची तरतूद असावी असेही म्हटले आहे. तर काहींनी विरोध दर्शवत सेक्स करताना कंडोम फाटू शकतो ते जाणून बुजून होत नाही त्यामुळे हे विधेयक चुकीचे आहे अश्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.






