सावद्यात टायफाईड, मलेरिया,व डेंग्यूचे रुग्णात वाढ औषध फवारणीची गरज
पालिका हद्दीत समाविष्ट असलेले एरिया धुरळणी सह औषध फवारणी पासून वंचित!
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
दोन वर्षापासून कोरोना सारख्या जीवघेण्या महामारी पासून संपूर्ण जग हैराण झालेला होता व आहे. नंतर डेल्टा प्लस वगैरे आजार समोर आले.आता टायफाईड, मलेरिया, वायरल इन्फेक्शन सह डेंग्यूचे आजारांनी डोके वर काढलेले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यवर होताना दिसत आहे म्हणून स्थानिक संबंधित प्रशासनाकडून याबाबत त्वरित उपाय योजना होणे गरजेचे आहे
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात सध्या टायफाईड, मलेरिया, दमछाक करणारा खोकला सह वायरल इन्फेक्शन, सोबत डेंग्यूचे रुग्ण वाढले आहे.व याचा परिणाम नागरिकांचे आरोग्य वर होताना दिसत आहे.
सदरील आजारां सह इतर आजाराच्या तावडीत सापडलेले रुग्णांमुळे शहरातील सर्व रुग्णालयात सकाळ पासून ते रात्री उशिरा पर्यंत तपासणी व उपचारासाठी येत असलेल्या पेशंटची सतत गर्दी दिसत असते.तसेच सध्याच्या काळात शहरातील ग्रामीण रुग्णालय मध्ये सुद्धा तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. तसेच रक्त व लघवी तपासणी साठी लॅबधारकांकडे ही रुग्णांची गर्दी होत आहेत. त्यात रक्तातील प्लेटलेट (वाईट पेशा ) कमी किंवा जास्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. सदरील आजाराचे रुग्ण संख्या मध्ये वाढ होत असली तरी यात डेंग्यूने सुद्धा आपले डोके वर काढलेले दिसत असून शहरात ३ ते ४ पेशंट डेंग्यू चे होते, यामुळे नागरिकांच्या चिंतेत अधिक भर पडलेली आहे. अशी स्थिती असताना शहरातील फक्त काही भागांमध्ये पालिका प्रशासनच्या वतीने फक्त धुरळणी झाली.
मात्र त्यापेक्षा औषध फवारणी अधिक परिणाम कारक असते.असे उघडपणे नागरिकांकडून ऐकण्यास मिळतात. म्हणून संपूर्ण शहरात धुरळणी सह औषध फवारणी नियमित व्हावी.व यासोबत सदरील निर्माण झालेली स्थिती समोर ठेवून शहराच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये मापक औषधी साठा शासनाने पुरवावा अशी देखील मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तसेच दि.४ नोव्हेंबर २०१८ पासून सावदा पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या सर्व नवीन भागात आज तागायत धुरळणी सह औषध फवारणी करण्यात आलेली नाही. परंतु आता तरी शहरासह पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या सर्व एरियामध्ये सुद्धा नियमित धुरळाणी सोबत औषध फवारणी केली जावी. तसेच याकडे पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगराध्यक्षा अनिता येवले,आरोग्य सभापती, सह नगरसेवक व विरोधी गटनेते फिरोज खान पठाण यांनी लक्ष देऊन येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीरता पूर्व विचार करावा अशी अपेक्षा केली जात आहे.
(९६६५३१२५५०)






