Maharashtra

आरोग्याचा मुलमंञ करा चरबी कमी, वाढवा इम्मुनिटी या पाच पदार्थां सोबत

आरोग्याचा मुलमंञ

करा चरबी कमी, वाढवा इम्मुनिटी या पाच पदार्थां सोबत

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएटिंग आणि फॅड्सचा अवलंब करतात, पण हा निरोगी पर्याय अजिबात नाहीये. वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे. मसाले केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीत तर हे मसाले तुमचे पुढे आलेले पोट किंवा ढेरी देखील कमी करू शकतात.

1) मेथीचे दाणे
मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे भूक कमी करण्यास मदत करते. हे आपल्याला अति खाणे टाळण्यास मदत करू शकते. तज्ञांचा असा विश्वास आहे की मेथी दाणे आहारातील चरबी आणि कॅलरी कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर मेथी दाण्यांचा तुमच्या आहारात अवश्य समावेश करावा.

२) काळिमिरे
काळी मिरी चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये एक चिमूटभर काळी मिरी घाला आणि दिवसातून दोन ते तीन वेळा त्याचे सेवन करा. याशिवाय तुम्ही सकाळी सकाळी 3 ते 4 काळी मिरीचे दाणे चघळू शकता आणि एक ग्लास कोमट पाण्यासोबत त्याचे सेवन करू शकता. काळी मिरीमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे जलद गतीने चरबी जाळतात. त्यामुळे त्याचे नियमित सेवन केले पाहिजे.

३) बडीशेप
बडीशेप हा आणखी एक भारतीय मसाला आहे जो वजन कमी करण्यास मदत करतो. हे भूक कमी करण्याचे किंवा दाबून ठेवण्याचे काम करते. आपण ते आपल्या चहामध्ये देखील मिक्स करु शकता. जीवनसत्त्वे ए, सी आणि डी या तत्वांनी समृद्ध असण्या व्यतिरिक्त बडीशेपच्या चहा मध्ये अनेक अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे चयापचय प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसेच हा चहा पचन क्रिया सुद्धा सुधारतो.

४) वेलची
रात्री गरम पाण्यासोबत वेलची खाल्ल्याने चयापचय दर वाढण्यास मदत होते. वेलची मध्ये मेलाटोनिन सारखे आवश्यक घटक असतात जे चयापचय दर वाढवण्यासाठी आवश्यक असतात. जस जसे चयापचयचा दर वाढतो तस तसं शरीरातील चरबी जलद गतीने जळण्यास बर्न होण्यास सुरवात होते आणि अधिक ऊर्जा निर्माण होऊ लागते. त्यामुळे लठ्ठपणा सोबतच इतर समस्यां पासून सुद्धा आराम मिळतो.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button