आजपासून बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला..!
मुंबई मराठी बिग बॉस आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत हे वाक्य आणि हा दमदार आवाज पुन्हा ऐकावयास मिळणार आहे.बिग बॉस मराठीच्या दोन्ही सिझन प्रचंड यशस्वी झाले. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो बिग बॉस आज १९ सप्टेंबर पासून पहावयास मिळणार आहे. या शोचे सूत्रसंचालन अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहे.
आज संध्याकाळी सात वाजता बिग बॉस मराठी सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३०वा. कलर्स मराठीवर प्रक्षेपित होईल. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची धम्माल मस्ती, एकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप याबद्दल तरूणपिढी मध्ये खूपच उत्सुकता असते यावेळेस पहिल्यांदा हे २४ तास VOOT वर बघायला मिळणार आहे. तसेच प्रेक्षक त्यांचे प्रश्न सदस्यांना “तुमचे प्रश्न” आणि संदेश चुगली बूथद्वारे पाठवू शकणार आहेत. कार्यक्रमाचे मूळ भाग प्रेक्षक कधीही VOOT वर प्रेक्षक बघूशकतील.






