फिक्स्ड डिपॉजिटचे नियम बदलले..होईल व्याज कपात.. नुकसान होण्याआधी जाणून घ्या काय आहेत नियम..!
नवी दिल्ली : फिक्स्ड डिपॉजिटमध्ये पैसे गुंतवणूक दारांसाठी महत्वाची माहिती आहे. रिझर्व बॅंकेने (RBI) एफडीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
RBI ने फिक्स्ड डिपॉजिटच्या नियमांमध्ये बदल केले असून मॅच्योरिटी पूर्ण झाल्यानंतर लगेच पैसे काढून घ्यावे लागणार आहेत. परताव्याची रक्कम क्लेम केली नाही तर त्यावर मिळणारे व्याज कमी होऊ शकते. हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजा प्रमाणे असेल. सर्वसाधारणपणे 5 ते 10 वर्षाच्या दीर्घ अवधीसाठी एफडीवर 5% व्याज मिळते तर सेविंग अकाऊंटवर व्याज दर 3 ते 4% व्याज असते.
हे आहेत नवीन नियम
5 वर्ष मॅच्योरिटी असलेल्या एफडीमध्ये पैसे गुंतवलेल्या FD चा क्लेम लगेच घ्यावा कारण तर बचत खात्याप्रमाणे प्रमाणे व्याज मिळत राहिल. त्यामुळे एफडी मॅच्योअर झाल्यास लगेच क्लेम करा अन्यथा तेथून पुढच्या कालावधीचे व्याज सेविंग अकाऊंटप्रमाणे सुरू होईल.
एफडी मॅच्योअर झाल्यानंतरही तुम्ही पैसे काढण्यासाठी क्लेम केला नसेल तर, तेवढ्याच अवधीसाठी ती पुढे वाढवली जात असे. आणि तोच व्याजदर देखील मिळत असे.
त्यामुळे यापुढे एफडी मॅच्योअर झाल्यावर लगेच क्लेम करा अन्यथा तुम्हाला व्याज कमी मिळू शकते.






