सावद्यातील दुसरे अवैध बायोडिझेल पंप मालक विरुद्ध कारवाई करणे म्हणजे संबंधित यंत्रणेला एव्हरेस्ट शिखर गाठण्या सारखे
युसूफ शाह सावदा
सावदा : कोणतीच परवानगी न घेता समरी पावरात आधीच अवैध बायोडिझेल विक्रीतून सावदा येथील दोन्ही पंप मालकांनी करून घेतली मोठी कमाई. याप्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विलंब लावून दोन पंप ऐवजी फक्त झुलेलाल बायोडिझेल पंपला सिल व काही पदिवसांनंतर त्याचे मालकवर रावेर तहसीलदार कडून सावदा पोलीसात गुन्हा दाखल होण्या मागचे कारण काय? तसेच रावेर रोडवरील दुसरे अवैध बायोडिझेल पंप मालक विरुद्ध कारवाई करण्यास संबंधित यंत्रणेला एव्हरेस्ट शिखर गाठण्यास विलंब लागत आहे. तरी जिल्हाधिकारी जळगांव व जिल्हा पुरवठा अधिकारी सह प्रांत अधिकारी फैजपूर यांनी या प्रकरणी रावेर तहसीलदार ची तातडीने खबर घेणे गरजेचे व आवश्यक झाले आहेत.
सावदा जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे एक नव्हे दोन पंप टाकून कोणतीच सरकारी परवानगी नसताना सर्रासपणे कायद्याचा कोणताही धाक न बाळगता स्थानिक व तालुका यंत्रणेच्या नाकाखाली अवैध बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा चालविला जात होता. या धंद्यातून पंप मालकांनी मोठी कमाई करून ते रावेर तहसीलदार यांच्या कुचकामी भूमिकांमुळे अटक ऐवजी आजही मोकाट फिरत आहे.
सदरील बहुचर्चित अवैध बायोडिझेल विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही सावदा येथील अवैध बायोडिझेल पंप मालकांनी मोठी आर्थिक कमाई सुद्धा केलेली आहे. तसेच या प्रकरणी पंप मालकांकडून संबंधित अधिकाऱ्यांची चांदीच चांदी झाल्याची चर्चा सुद्धा आता नागरिकांमध्ये होत आहे.
याबाबत फैजपूर रोडवर डायमंड ट्रान्सपोर्टच्या मागे भाड्याने घेतलेली जागेवर सुरू असलेले झुलेलाल बायोडिझेल पंपला फक्त नाम मात्र पंचनामा करून सावदा मंडळ अधिकारी संदीप जयस्वाल, पुरवठा निरीक्षक रावेर यांनी सील केले व या पंप मालकवर उशिरा गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप पोलिसांकडून त्याला अटक झालेली दिसत नाही. तसेच महिना उलटून ही सावदा येथे रावेर रोडवरील दुसरे अवैध बायोडिझेल पंप मालका विरुद्ध सरकारी यंत्रणेला गुन्हा दाखल करणेकामी एव्हरेस्ट शिखर गाठण्या सारखेच वाटत असावे म्हणूनच की काय या पंपाला नाम मात्र पंचनामा करून साधी सील सुद्धा आजपावेतो लावण्यात आली नसल्याने संबंधित सरकारी यंत्रणेची यामागील लाचारी काय? किंवा या प्रश्नचे उत्तर कारवाईतून कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सदरील पंप मालकांना कागदपत्र सादर करण्याच्या नावाखाली जाणीपूर्वक रित्या उशिरा माफी मुदतवाढ रावेर तहसीलदार यांनी न देता वेळीच घटनास्थळी सखोल चौकशी करून ठोस पंचनामा करून पंप मालकांवर गुन्हा दाखल केला असता तर या अवैध पंप मालकांना पसार होण्याची संधी मिळाली नसती व ते पोलिसांच्या हाती लागले असते आणि मोकाट ऐवजी त्यांना अटकही झाली असती. मात्र सुरुवातीपासून रावेर तहसिलदाराकडून मिळालेली मोकळी संधीचा सोना करून अवैध कारभारातून केलेली मोठी कमाईतून स्वतःला वाचवण्यासाठी पंप मालक दुतर्फी फायदा घेवून थेट कायद्याचा आधार घेत अटकपूर्व जामीन मिळवून मोकाट मजेत फिरतील. याला कारणीभूत व जबाबदार कोण? याची त्वरित सखोलपणे चौकशी जिल्हाधिकारी जळगांव व जिल्हा पुरवठा अधिकारी सह प्रांत अधिकारी फैजपूर यांनी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.






