नासिक ला मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा रॅगिंग प्रकरणी संशयास्पद मृत्यू
शांताराम दुनबळे नाशिक
नासिक : नाशिक येथील ङाॅ वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये डॉ स्वप्नील महारूद्र शिंदे वय वर्षे २६ या शिकाऊ डॉक्टरचा रॅगिंग प्रकरणी संशयास्पद मृत्यू झाला आहे तो गायनेकालोजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता याप्रकरणी दोन मुलीसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे कुटुंबियांना सह नातेवाईक यांनी केली आहे रँगिग प्रकरणातून ङाॅ स्वप्नीलचा घातपात झाला असून त्याच्याकडे आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणाऱ्यांची नावे दिली आहे याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे तर कॉलेज प्रशासनाकडून या आरोपचे खंडन केले आहे या घटनेबाबत प्राचार्य डॉक्टर मृणाल पाटील यांनी सांगितले की मयत झालेला विद्यार्थी डॉक्टर वर मानसोपचार सुरू होते रॅगिंग होत असल्याबाबतची कोणतीही तक्रार नव्हती याप्रकरणी यापूर्वी त्याच्या पालकांना बोलावण्यात आले होते फेब्रुवारीपासून तो बीड येथील त्याच्या घरी होता जून मध्ये कॉलेजला परतल्यानंतर त्याच्या आईला त्याच्या सोबत राहण्याची ची परवानगी देण्यात आली होती त्याची आई त्याच्या सोबतच राहत होती मात्र त्यांनी आपल्याकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे प्राचार्य डॉक्टर मृणाल पाटील यांनी सांगितले