जिल्ह्यात मंगळवारी 50 mm पावसाची नोंद तर तालुक्यात 70 mm नोंद…
जळगाव, (जिमाका) दि. 18 – जिल्ह्यात कालपासून पावसाचे दमदार आगमन झाले असून मंगळवारी (17 ऑगस्ट)जिल्ह्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून काल सर्वाधिक 80.7 मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस 28.8 मिमी पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाल्याचे कृषि विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
त्यानुसार जिल्ह्यात तालुकानिहाय जूनपासून आजपर्यंत (18 ऑगस्ट, 2021) पर्यंत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (जून ते आजपर्यंतच्या सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- 315.3 मिलीमीटर (66.1 टक्के), भुसावळ- 292.2 मि.मी. (69.6), यावल- 292 मि.मी. (65.5), रावेर- 324.6 मि.मी. (76), मुक्ताईनगर- 247.2 मि.मी. (65), अमळनेर- 262.2 मि.मी. (65.3), चोपडा- 233.4 मि.मी. (50.7 टक्के), एरंडोल- 406मि.मी. (96.1), पारोळा- 473.9 मि.मी. (113.73), चाळीसगाव- 427.7 मि.मी. (109.1), जामनेर- 366.9 मि.मी., (78.7), पाचोरा- 364.3 मि.मी. (86.8), भडगाव- 355.7 मि.मी. (84.8) धरणगाव-388.8 मि.मी. (73.4), बोदवड-318.6 मि.मी. (73) याप्रमाणे जिल्ह्यात ऑगस्टपर्यतच्या सरासरीच्या एकूण 333.4 मि.मी. म्हणजेच 78.1 टक्के इतका पाऊस पडल्याचे कृषि विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.
Amalner – 110.0 mm
Shirud- 97.0 mm
Patonda – 73.0 mm
Marvad – 85.0 mm
Nagaon – 51.0 mm
Amalgaon- 60.0 mm
Bharvas – 48.0 mm
Vavde – 38.0 mm
Total – 562.0 mm
Days Average- 70.25 mm
progressive – 193.19 mm