जानोरी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार जिल्हा परिषद नाशिक व दिंडोरी पंचायत समिती असे दोन पुरस्कार
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला नाशिक जिल्हा परिषद कडून सन2019- 2020 या वर्षात स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील जानोरी
ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले असून दहा लाख रुपयाचे बक्षीस पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्कार 2020-2021 या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्यपुरस्कृत ग्रामीण आवास योजना मध्ये तालुकास्तरीय जानोरी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळून दिंडोरी तालुक्याचे गटविकास अधिकारी भावसार तसेच सभापती कामिनीताई चारोस्कर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह मिळाल्याने जानोरी गावात फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
जानोरी गावाला मिळालेला पुरस्कार हा गावचा विकास बघूनच दिला आहे. गावात प्रत्येक कुटुंबाला फिल्टर पिण्याचे पाणी मिळते, रस्ते डांबरीकरण, प्रत्येक रस्त्याला कडेला व गल्लीत पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रेट रस्ते करण्यात आले आहे. प्रत्येक वाडी-वस्तीवर पाण्याची स्वच्छतेची विजेचे रस्त्यांची सुविधा करण्यात आलेली आहे. गावात अतिशय सुंदर स्मशानभुमी बांधण्यात आलेली आहे. संपूर्ण गावात अंडरग्राउंड गटारीचे काम झालेले आहे. गावात जिल्हा परिषद शाळा व रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले विद्यालय अतिशय सुंदर आहे. हा विकास करण्यासाठी मागचा इतिहास बघितला तर गावातील प्रत्येक जाती धर्मातील नागरिक सामाजिक कार्याकर्ते सहभागी होतात. गावातील तंटा आणि मतभेद अजूनही पंच कमिटी कडून मिटवले जातात आणि दोनही पक्ष निर्णय मान्य करतात.लोकांमध्ये स्वयंशिस्त आहे. गावाच्या अलिखित नियमांचे पालन केले जाते. समाज हिताच्या कामात लोक सामाजिक, राजकीय भेद विसरून एकत्रित येतात. निस्पृहपणे काम करत असलेले वर्गाची मोठी फळी आहे. गावातील जुन्या जाणत्या बुजुर्ग लोकांचा सल्ला आजही मान्य केला जातो. गावात पोलीस स्टेशन नाही. त्यामुळे निस्पृहपणे काम करनार्या पोलीस पाटालांची व तंटामुक्ती अध्यक्षांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. गावात अजूनही धार्मिक उत्सव, सण, परंपरा आजही जपल्या जातात. चालू राजकीय परिस्थितीशी जुळवून घेणारे राज्यकर्ते आहेत. राजकीय पक्षांचे नेत्यां कडून खुबीने काम करवून घेतले जाते. गावात होत असलेल्या विकास कामाला प्रोहत्सान दिले जाते. त्यामुळे सत्तेत असलेल्या व्यक्तीला काम करण्यास हुरूप वाढतो. गावात अत्यल्प अतिक्रमण आहे. सामाजिकता जोपासन्या मध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. गावातील पत्रकार, आणि सुशिक्षित तरूणांचा राजकारण आणि सामाजिक कार्यातिल मोठा सहभाग असतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाव विकासात आत्ता पर्यंत प्रत्येक पिढीने काम केले आहे. प्रत्येक कुटुंबाचे योगदान सामाजिक कार्यात, राजकीय सत्तेत आहे. परिणामी गाव आपले आहे. त्यातील लोक आपले आहे. ही भावनाच हा पुरस्कार मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे असा प्रत्येक जानोरी गावातील नागरिकांना वाटत आहे.
या पुरस्कारचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, पंचायत समिती सभापती कामिनी चारोस्कर, माजी जि. प सदस्य शंकराव काठे. माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे
ग्रामपंचायतीचे सदस्य शंकरराव वाघ विष्णुपंत काठे दत्तात्रय घुमरे, अशोक केंग, सुभाष नेहेरे, नामदेव डंबाळे, हिराबाई भोई, ललिता वाघ, विस्ताराधिकारी अण्णा गोपाळ, ग्रामसेवक के. के. पवार, तलाठी किरण भोये, पोलीस पाटील सुरेश घुमरे, तंटामुक्ती अध्यक्ष रेवचन्द वाघ, शंकरराव चारोस्कर, कडूअण्णा वाघ, ज्ञानेश्वर डवणे, सोपान काठे, राजकुमार वाघ, गोरख तिडके, पोपट काठे, हर्षल काठे, योगेश तिडके, डी. बी काठे, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आदी ग्रामस्थ उपस्थितत होते. त्यावेळी मिळालेला स्मार्ट ग्राम पुरस्कार कर्मचाऱ्यांनी आपल्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले म्हणून नाचून आनंद साजरा केला
प्रतिक्रिया
जनतेने वेळोवेळी सहकार्य करून शासकीय फी कर महसूल जमा करून विकास कामाला सहकार्य करावे
अण्णा किसन गोपाल
विस्तार अधिकारी तथा प्रशास क
जानोरी
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय हे दोन्ही पुरस्कार जानोरी गावासाठी एक अभिमान असून हे पुरस्कार मिळवण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग व सहकार्य असल्यामुळेच हे पुरस्कार मिळाले
काशिनाथ के पवार
ग्रामविकास अधिकारी जानोरी






