मैत्री वृक्ष पटर्नचे सर्वत्र कौतुक…!गांधली येथे 1300 वृक्षांची लागवड….
गांधली गावामध्ये बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी 1300 वृक्ष सामाजिक वनीकरण रोपवाटिका यावल या ठिकाणी मोफत मिळाली फक्त प्रवासाचा खर्च करावा लागला ही रोपे गाडीमध्ये भरताना व उतरताना गांधली गावातील पाणी फाउंडेशन चे समृद्ध गाव योद्धे युवक टीम यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे गांधली गावचे ग्रामरोजगार सेवक सचिन ठाकरे हेदेखील स्वतः या बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर ती मदत करत असतात मागील आठवड्यात जी वृक्ष लागवड करण्यात आली होती त्या सर्व वृक्षांना आधार देण्यासाठी काट्या लावण्यात आल्या वृक्ष लागवड करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच व पाणी फाउंडेशन ची समृद्ध गाव योद्धे व पंचायत समितीच्या टिम च्या माध्यमातून यांना प्रत्येक वेगवेगळ्या स्तरावर ती मतत केली जाते अमळनेर तालुक्यातील मैत्री वृक्ष पॅटर्न माहाराष्र्टामध्ये ओळख निर्माण करण्यासाठी खूप सुंदर रित्या हि यूवा टिम काम करत आहेत अशा सर्व ध्येयवेड्या वृक्ष मित्रांना सलाम..






