राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत अमळनेरच्या दर्शिताची चमकदार कामगिरी.. देशातून पटकावला तिसरा क्रमांक..
अमळनेर जयपूर येथील एस.एस.जैन सुबोध स्वायत्त महाविद्यालयाने जुलै महिन्यात राष्ट्रीय आंतर महाविद्यालयीन विविध विषयांवरील सादरीकरण स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी दर्शिता परेश जाधव हिने देखील सहभाग घेतला होता. उत्तम सादरीकरण करत दर्शिताने ह्या स्पर्धेत भारतातून तृतीय क्रमांकाचे व्यक्तिगत स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक पटकावले आहे.
या स्पर्धेत दर्शिताने सोशल मीडिया बून विषयावर अतिशय सादरीकरण केले होते.या स्पर्धेमध्ये देशभरातून नामांकित १२० पेक्षा विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. अत्यन्त अटी तटीच्या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दर्शिताने अमळनेर तालुक्याचे आणि महाविद्यालयाचे नाव संपूर्ण देशात पोहचविले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन दर्शिताचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, चिटणीस प्रा.डॉ. ए. बी.जैन , प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी. आर. शिरोडे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र माळी, प्रा.डॉ.योगेश तोरवणे,प्रा सूर्यवंशी,
प्रा.किरण भागवत इ उपस्थित होते.






