Amalner

वाळू माफियांना हिरेंचा दणका…एकाच वेळी अवैध वाळू वाहतूक करणारे 5 ट्रॅक्टर जप्त…चालक मालकांवर गुन्हे दाखल..

वाळू माफियांना हिरेंचा दणका…एकाच वेळी अवैध वाळू वाहतूक करणारे 5 ट्रॅक्टर जप्त…

अमळनेर हिंगोणा शिवारातील बोरी नदीचे पात्रातुन मोठ्या प्रमाणात अवैध गौण
खणिजाचे उत्खनन करुन ट्रॅक्टर चे साह्याने गौण खणिज (वाळु) चोरी होत आहे. बाबत असल्याची तक्रार मा. श्री प्रविण मुंडे सो, पोलीस अधिक्षक जळगाव यानां प्राप्त झाले वरुन त्याचे आदेशान्वये मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो श्री सचिन गोरे व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक तसेच सोबत पोहेकाँ/ सुनिल राजाराम पाटील, पोहेकाँ/ राजेंद्र कोठावदे,पोहेकाँ/ अरुण बागुल पोकाँ गोकुळ सोनवणे , पोकाँ/विलास बागुल , पोकाँ अमोल पाटील , पोकाँ/ राहुल पाटील अशा पथकाने
गोपनिय रित्या रेती माफियांनी ठिकठिकाणी उभे केलेले वॉचर ला (खबरी) चकवून अमळनेर पोस्टे हद्दीतील हिंगोणा शिवारातील बोरी नदिचे पात्रात आज दिनांक ११/०८/२०२१ रोजीचे सकाळचे वेळेस ०६.०० वा. अचानक छापा
टाकुन गौण खणिज (वाळु)अवैध्य रित्या चोरी करून वाहनात भरीत असतानां मिळुन आले ते खालील प्रमाणे

1)04,00000/-रुपयेकिं.चे.एक स्वराज 744 कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रक्टर क्रमांक एम.एच.19/ बीजी 6402 त्यास विना क्रमांकची ट्राली त्याच्यावरील चालक अनिल चंद्रसिग मोरे रा. रुबजी नगर अमळनेर व मालक बाळु संतोष पाटील रा. वडचौक अमळनेर

2) 04,00000/-रुपये किंमतीचे एक स्वराज 744 कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रक्टर क्रमांक एम. एच 40 एल 7991 – त्यास विना क्रमांकची ट्राली त्याच्यावरील चालक शिवाजी बाबुलाल ठाकरे रा. हिंगोणे ता, अमळनेर व मालक रोहीत कंखरे रा. पैलाड अमळनेर

3) 04,00000/-रुपये किं.चे.एक स्वराज 735 कंपनीचे ट्रक्टर क्रमांक एम. एच 19ए एन 1318 त्यास विना क्रमांकची ट्राली त्याच्यावरील चालक व मालक रोहीत हिंमत कंखरे रा. पैलाड अमळनेर

4) 04,00000/-रुपयेकिं.चे.एक स्वराज 744 कंपनीचे ट्रक्टर क्रमांक एम. एच 19 बीजी 7558 – त्यास विना क्रमांकची ट्राली त्याच्यावरील चालक जितेस वंजी संदानशिव रा. ताडेपुरा अमळनेर व मालक राज अविंद खंदार रा. भागवत रोड अमळनेर

5) 04,00000 -रुपयेकिं.चे.एक स्वराज 744 कंपनीचे ट्रक्टर क्रमांक एम. एच 18 झेड 7768 – त्यास विन क्रमांकची ट्राली त्याच्यावरील चालक व मालक घनश्याम डिंगबर चव्हाण रा. गलवाडे रोड अमळनेर

6) 12500/- रुपये किमतीची 5 ब्रास वाळु त्या पैकी 03 ब्रास जप्त व 02 ब्रास नदिपात्रात उपसलेली एकुण-20,12,500/-(वीस लाख 12 हजार पाचशे रुपये किंमतीचे एवज त्यात 05 ट्रक्टर ट्राली सह व दोन ब्रास रेती वरिल नमुद वाहन चालक हे त्याचे मालकाचे सागणे वरुन त्याचे ताब्यातील वरिल नमुद वाहनात गौण
खनिज चोरी करुन वाहनात भरत असतानां मिळुन आले.

वरिल नमुद चालक व मालक यांच्या विरूद्ध पोकाँ अमोल राजेंद्र पाटील यानी फिर्याद दिले वरुन अमळनेर पोस्टेला भादवि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.गुन्हयाचा तपास पोना/कैलास शामराव शिंदे अमळनेर पोस्टे हे करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button