हिंगोणे खु.प्र.ज. येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ…
मारवड पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज. येथील माहेर असलेल्या विवाहितेचा कल्याण येथे सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याने पाच जणांविरुद्ध मारवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोणे खु.प्र.ज. येथील माहेर असलेल्या नेहा उर्फ योगिता संतोष शिंदे यांचे लग्न २०१९ मध्ये संतोष प्रकाश शिंदे यांच्याशी झाले होते. लग्नाच्या नंतर दोन तीन दिवस विवाहितेचा चांगली वागणूक देण्यात आली.त्यानंतर माहेरून १० लाख रुपये आणावे या मागणी करिता वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करत शिवीगाळ व मारहाण सासरच्या मंडळींकडून करण्यात आली. तसेच विवाहितेचा आई वडिलांना देखील शिवीगाळ केली. विवाहितेचा पतीने अश्लील चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली अशी फिर्याद सदर विवाहितेने दिली असून त्यावरून आरोपी पती संतोष प्रकाश शिंदे, सासू किरनावती प्रकाश शिंदे, नणंद सुरेखा कमलाकर पाटील, नणंद उर्मिला निवृत्ती पाटील, नंदुई भाऊ निवृत्ती पाटील यांच्याविरुद्ध भादवी कलम ४९८ अ, ३२३, ५०९, ५९४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपो नि राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. सुनील तेली हे करीत आहेत.






