चोऱ्यांचे सत्र सुरूच…ग स हायस्कुल जवळ चोरी…
अमळनेर येथील राजेंद्र कन्हैयालाल नांदोडे वय 60 वर्षे धंदा सेवानिवृत्त शिक्षक रा. अनुराधा अपार्टमेंट पहिला मजला रुम नं. 2 जी.एस.
हायस्कुल जवळ अमळनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मी वरील ठिकाणी माझी पत्नी मंगलाबाई राजेंद्र नांदोडे व माझा मुलगा अमोल राजेंद्र नांदोडे यांच्यासह राहतो व मिळणा-या पेंशनवर कुटुंबाचे पोट भरतो.आज दि.
26/07/2021 रोजी दुपारी 12.00 वाजेच्या सुमारास धुळे येथे ड. संजय गोरे यांच्याकडे मुलाला उपचारासाठी घराला कुलुप लावुन गेलो होतो. आमचे धुळे येथीलँ दवाखाण्याचे काम संपल्याने धुळे येथुन अमळनेर येथे दुपारी 03.00 वाजेच्या सुमारास घरी आलो असता, माझ्या घराचे कडी कौडा उचकुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझ्या संमतीशिवाय लबाडीच्या ईराद्याने घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे वस्तु त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.193500/- रुपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाचे मणीमंगळसुत्र, 273000/- रुपये कि.चे चांदीचे
साखळ्या 715000/-रु.कि.चे सोन्याची अंगठी, 5 ग्रॅम 7500/-रु. किं.चे बेले चांदीचे 1000/रू.कि.चे गणपती चांदीचे दोन कईन. 11000/- रु.किं.चे लक्ष्मी दोन कॉईन चांदीचे, 500/- रु.किं.चे कुबेर दोन कॉईन येणेप्रमाणे वरिल वर्णनाचा व किंमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेला असुन सदर अज्ञात चोरट्याविरुध्द माझी कायदेशीर फिर्याद आहे.






