Nandurbar

दिव्यांगांना साहित्य वाटपासाठी प्रयत्नशिल – खा. डॉ. हिना गावीत

दिव्यांगांना साहित्य वाटपासाठी प्रयत्नशिल – खा. डॉ. हिना गावीत

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाअंतर्गत कृत्रिम अंग निर्माण (एलिम्को) – यांच्यामार्फत दिव्यांगांना साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पात्र व गरजु लाभार्थ्यांना हे साहित्य दिले जात असल्याची माहिती खा. डॉ. हिना गावीत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना दिला. तसेच नंदुरबारात आयोजित कार्यक्र मातुन नंदुरबार तालुक्यातील २१६ दिव्यांगांना साहित्यांचे वाटप करण्यात आले. नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये सामाजिक अधिकारिता शिबीर घेण्यात आले. या शिबीरातुन नंदुरबार तालुक्यातील २१६ लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक उपकरणे वाटप करण्यात आले. यावेळी खा. डॉ. हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते साहित्यांचे वाटप झाले. त्यात ट्रायसायकल प्रौढ, ट्रायसायकल लहान, मोटारयुक्त ट्रायसायकल, व्हिलचेअर प्रौढ व्हिलचेअर लहान, श्रवण यंत्र, चालण्याची काठी, मिसेड किट, सिपीचेअर, चेष्मा, टेट्रापॉड, ट्रायपॉड, वॉकर असे साहित्य देण्यात आले. याकार्यक्रमास डॉ. सुप्रिया गावीत, सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी, पं.स. सभापती प्रकाश गावीत, सविता जयस्वाल, संतोष समाज कल्याण अधिकारी वसईकर, लक्ष्मण माळी, नरेंद्र नांदगावकर, भाजपा दिव्यांग माळी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button