देखा भो कोरोना लगीन,मयत बजार मा व्हस.. किर्तन मा नयी..! किर्तनमा गर्दी चालस… स्थानिक प्रशासन राजकीय नेत्यांच्या बगलेत..नियम फक्त सामान्य माणसाला..!
अमळनेर येथे आज दुपारी ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मा इंदुरीकर महाराज यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाला गर्दीचा उच्चांक गाठला होता.कोरोना नियमांचे उल्लंघन करत आज तुफान गर्दीत हा किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. हजारो लोक इथे विना मास्क व सोशल डिस्टनगसिंग चा फज्जा उडवत जमा झाले होते. शासकीय नियमानुसार लग्न,इतर सोहळे,मृत्यू, सभा इ ना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना नंतर डेल्टा प्लस ह्या व्हायरसने धुमाकूळ घातल्याने शासनाने जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. ह्या पार्श्वभूमीवर दुकाने बाजार यांना संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नियम घालून देण्यात आले आहेत. शाळा महाविद्यालये बंद आहेत.कार्यालये अंशतः सुरू आहेत.घरून काम करा असे निर्देश मोठं मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. ह्या सर्व परिस्थितीत आज स्थानिक प्रशासन राजकीय नेत्यांचे गुलाम आहे हे स्पष्ट झाले आहे.लहान सहान व्यापारी मजूर,कामगार,हात गाडी धारक यांच्याकडून दंडाची रक्कम जबरदस्तीने वसूल करणारे प्रशासन,अर्धा तास छोटे दुकान आवरून बंद करायला उशीर झाला म्हणून अंगावर काठ्या तोडणारे प्रशासन आज झोपले होते का? नियम फक्त सामान्य माणसाला लागू आहे का? राजकीय नेत्यांना सूट असेल तर तसे परिपत्रक काढून जाहीर करून टाका असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मोठे व्यापारी,दिग्गज श्रीमंत लोक ज्यांची मोठ्या लोकां मध्ये ओळख आहे असे हं.. राजकीय नेते सर्रास कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. आणि हा विषय कोरोनाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरू असून ठोस प्रहार ने वेळोवेळी हा मुद्दा उचलून सामान्य माणसाची,कामगारांची,छोट्या दुकनदारांची हाथ गाडी धारकांची बाजू मांडली आहे.
सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्याने कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अनेक लोकांनी आपले सर्वस्व गमावले आहे.अनेकांनी आपले प्राण गमावले असून तळई येथे संपूर्ण महाराष्ट्रातुन मदत पाठवली जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर एका किर्तनकाराला फक्त वाकड तिकडं बोलण्यासाठी ,महिलांच्या विरुद्ध बोलण्यासाठी,समानतेच्या विरोधात बोलण्यासाठी निव्वळ बडबड ऐकण्यासाठी लाखो रुपये मानधन देऊन बोलावणे,गर्दी जमा करणे ते ही एका अश्या पक्षाच्या नेत्यांनी ज्यांचे सर्वेसर्वा स्वतः महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती बाबतीत चिंतेत आहेत मदत करत आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अनेज दिग्गज नेते,कार्यकर्ते ह्या किर्तनाला उपस्थित होते.तर आता ही गर्दी जमा करणाऱ्या ह्या संबंधित लोकांवर प्रशासन गुन्हा दाखल करेल का? दंडाची किती रक्कम आकारण्यात येईल? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.याच उत्तर प्रशासनाने लवकरात लवकर द्यावे..!राजकीय नेत्यांच्या बगलेत राहू नये..!मोकळा श्वास घ्यावा व 2% राजकीय नेत्यांसाठी तुम्ही नसून 98% जनतेसाठी आहात..!पगार राजकीय लोक देत नाही तुम्हाला शासन देते आणि शासनाच्या नियमांचे तुम्हीच उल्लंघन केल्यास तुम्हाला काय दंड असेल असाही प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.






