Amalner

आमदारांना आली नादारी..!शासकीय आरोग्य शिबिरात घुसखोरी..! आरोग्य शिबीर राजकीय की शासकीय…! तर अधिकाऱ्यांची चिलीम तंबाखू…

आमदारांना आली नादारी..!शासकीय आरोग्य शिबिरात घुसखोरी..! आरोग्य शिबीर राजकीय की शासकीय…! तर अधिकाऱ्यांची चिलीम तंबाखू…

अमळनेर येथे काल ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर राजकीय की शासकीय असा जनतेला प्रश्न पडला आहे. कारण मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यमान आमदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सदर शिबीर आयोजित केले होते. अश्या आशयाचे msg सोशल मिडिया, वृत्तपत्र, ऑनलाइन मिडिया च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले होते. तर शिबीर संपन्न झाल्यानंतर देखील मा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न असेच वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. आता प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की राजकीय कार्यक्रमांना शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहू शकतात का? किंवा ते असा राजकीय कार्यक्रम आयोजित करू शकतात का?ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी अनुक्रमे डॉ ताळे व डॉ गोसावी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी हा आमचा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगीतल्या प्रमाणे कार्यक्रम होता.राजकीय उपक्रम नव्हता तर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनीवरून बोलण्यास नकार दिला. याविषयी मी काही सांगू शकत नाही. तुम्ही डॉ ताळे यांच्याशी संपर्क साधा तर डॉ ताळे ह्यांनी तुम्ही जिल्हा चिकित्सक डॉ चव्हाण यांच्या शी संपर्क करा असे म्हणत “चिलीम तंबाखू इस घरकू केले आहे…”

एकूणच काय तर आमदारांना प्रचंड नादारी आली आहे.. वाढदिवसाचा खर्च कोटींच्या घरात होता म्हणे..!त्यामुळे त्यांना आता अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचा खर्च परवडणार नव्हता ना..! कस हे एक आरोग्य शिबीर म्हटलं म्हणजे दोन तीन मंडप आले एखादा हॉल घ्या..बाहेरचे डॉ आले म्हणजे त्यांचे मानधन द्या नाही का..!मग एव्हढा खर्च झेपला नसता ना..!अजून 22 कोटीची कामे पूर्ण झाली नाहीत ना..(यावर लिहिणार आहे लवकरच)..!मग काय शासन आपलं..प्रशासन बगलेत..डॉ शासनाचे..वाढदिवस नेत्याचा..प्रसिद्धी आमदारांची..!सब शिक्का फुकट चलाने का..!

एकंदरीतच ह्या सर्व प्रकारात शासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांची मस्त मिलीभगत झाली आणि अखेर शासनाच्या खर्चात आमदारांनी एक प्रोजेक्ट पूर्ण केला..हुश्श…! कस हे वर फोटो गेले ना राव फुकट कार्यक्रमाचे ..! अशी जोरदार चर्चा गावात सुरू आहे.जे नियमित रुग्ण आले दवाखान्यात आणि जे थोडे फार बाहेरून आले त्यांची तपासणी करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.निव्वळ फोटो जेनिक उपक्रम राबविण्यात आला अशीही चर्चा गावात सुरू आहे. एका लोकप्रतिनिधी ने अश्या पद्धतीने शासकीय जागा,अधिकारी कर्मचारी यांचा वापर करून घेत उपक्रम पूर्ण करण्यात आला आहे. एखाद्या सामान्य नागरिकाने जर स्वतःच्या वाढदिवशी किंवा कुटुंबियांच्या वाढदिवशी असा उपक्रम राबवा असे सांगितले तर ग्रामीण रुग्णालयात शिबीर होईल का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.आमचेही उपक्रम शासनाने राबवावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

आमदारांना आली नादारी..!शासकीय आरोग्य शिबिरात घुसखोरी..! आरोग्य शिबीर राजकीय की शासकीय...! तर अधिकाऱ्यांची चिलीम तंबाखू...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button