भारताला सुवर्णपदक प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश
परवाच भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्प्किमध्ये भारताला रौप्य पदक प्राप्त करत भारताला दमदार सुरुवात करून दिली होती. आज लगेच युवा कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
एकीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू पदक प्राप्त करत आहेत तर दुसरीकडे हंगेरी इथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये भारताला मोठं यश मिळालं आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने या स्पर्धेत 75 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.
प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे. प्रियाने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्याचवर्षी 2019 मध्ये दिल्लीमध्ये 17 व्या स्कूल गेम्समध्येही तिने सुवर्ण जिंकलं असून 2020 मध्ये पटना येथील नॅशनल कॅडेट चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्ण पदक मिळवलं आहे.
संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात प्रियावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






