पोलीस ठाण्यातील कामकाजाचे व्हिडीओ शुटींग, एकाविरुध्द गुन्हा
नंदुरबार फहिम शेख
पोलीस ठाण्यातील कामकाजाची व्हिडीओ शुटींग करणाऱ्या एकाविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगांव तालुक्यातील कुंडील येथील रहिवासी व सध्या नंदुरबारातील नागाई नगरात राहणारे शरद भिलाड्या पाडवी याने अक्कलकुवा पोलीस
ठाण्यात विनापरवानगी प्रवेश करुन शासकीय कामकाजाची मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केली. तसेच एका गुन्ह्यात जबाब नोंदविण्याचे काम सुरु असतांना शरद भिलाड्या पाडवी याने पोलीस ठाण्यातील कामकाजाची गुप्तपणे व रेकॉर्डिंग करीत शासकीय कामकाजाच्या गोपनियतेचा भंग केला. याबाबत पोशि. अश्विन ठाकरे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरद भिलाड्या पाडवी (रा. कुंडील ता. धडगांव) याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९२० (अ) सह शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन करीत आहेत.






