भा ज प ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस पदी भारती सोनवणे
अमळनेर : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकताच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख वक्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झाली.यावेळी ओबीसी मोर्च्यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर,राष्ट्रीय महामंत्री संगमलाल गुप्ता,संजय कुटे,आशिष शेलार,मंगल प्रसाद लोढा,महाराष्ट्र भा ज प ओबीसी प्रदेशाध्यक्ष अतुल भाताळकर,भा ज प प्रदेश सरचिटणीस योगेश टिकेकर,शंकरराव वाघ,संजय गाते,बापूसाहेब घडामोडे, वनिता लोंढे उपस्थित होते.
या बैठकीत भा ज प ओबीसी मोर्च्यांचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिकेकर यांच्या हस्ते अमळनेरच्या भारती सोनवणे यांना भा ज प ओ बी सी मोर्चा प्रदेशचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.






