Crime Duniya:हा आहे जगातील सर्वात लहान सिरीयल किलर..!वय वर्ष फक्त 8 आणि
गुन्हेगारी जगतात आणि इतिहासाच्या पानांमध्ये मालिका, हत्या, सिरीयल किलिंग चे अनेक किस्से आहेत.खूप मोठे मोठे गुन्हेगार सिरीयल किलिंग असो की इतर कोणतेही गुन्हे कायद्याच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत.आज जाणून घेऊ अशा एका सीरियल किलरबद्दल जो फक्त 8 वर्षांचा होता. आणि तो जगातील सर्वात लहान सिरीयल किलर होता…
प्रकरण आहे 2007 मधले…बिहारच्या बेगूसरायमधील मुसहरी गावात एकामागून एक दोन निरपराध मुलींची हत्या करण्यात आली. गावात दहशत पसरलेली होती.पोलिसांना देखील माहीत नव्हतं की ते एका 8 वर्षाच्या मुलाला पकडण्यासाठी जात आहेत.. अजब आणि भयानक वातावरण निर्माण झालेले होते…
खुनी सर्वांसमोर होता, पण कोणाचाही विश्वास बसत नव्हता..
हा लहान मुलगा बिहार मधील एका लहान खेड्यात राहणारा अमरदीप होता..!त्याचा जन्म 1998 मध्ये मजुर कुटुंबात झाला.त्याचं कुटुंब अतिशय गरीब होतं. अमरदीप हा मोठा मुलगा होता. २००७ मध्ये मुशाहारी गावात राहणाऱ्या चूनचून देवीनं जवळच्या पोलीस ठाण्यात अमरदीप विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानं केलेले गुन्हे उजेडात आले. आपल्या खुशबू नावाच्या मुलीचा अमरदीपनं खून केला असल्याची तक्रार चुनचून ने केली. शाळेत मुलीला खेळण्यासाठी सोडून ती नेहमीप्रमाणं आपल्या कामाला गेली होती. मात्र, जेव्हा ती परत आली तेव्ही तिची मुलगी तिला दिसली नाही.हे गाव अतिशय कमी लोकवस्तीचं होत त्यामुळे गावातून एखादं मुलं बेपत्ता होणं अशक्य होते. पण गावकऱ्यांनी काही माहिती दिल्या मुळे खुशबूच्या बेपत्ता होण्यामागे अमरदीप असल्याची शंका चूनचूनला आली.आणि तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अमरदीप आणि त्याच्या कुटुंबियांची चौकशी करायला सुरुवात केली आणि मग ह्या 8 वर्षीय मुलाचे सर्व कारनामे समोर आले. त्याच्या आई-वडिलांनी तो निर्दोष वाटला पण अमरदीपने अगदी शांतपणे आपले गुन्हे कबुल केले. खुशबूचा खून केल्याचं आणि तिचा मृतदेह पुरून टाकल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. त्यानं सांगितलेली ही गोष्ट ऐकून पोलिसांना मोठा धक्काच बसला कारण आठ वर्षाच्या मुलावर विश्वास ठेवणं खूप कठीण होतं.पण अमरदीपनं खुशबूचा पुरलेला मृतदेह पोलिसांना उकरून दाखवला तेव्हा मात्र सर्वांनाच धक्का बसला.
चौकशीदरम्यान धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे खुशबू च्या त्याने आणखी दोन मुलींचा खून केला होता.सर्वात आश्चर्याजनक बाब म्हणजे त्यातील एक त्याची स्वत:ची सख्खी बहिण होती तर दुसरी चुलत बहीण… दोघींचंही वय एक वर्षापेक्षा कमी होतं.
त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती होती. मात्र, त्याला वाचवण्यासाठी त्यांनी त्याच्या गुन्ह्यांची वाच्यता केली नाही असे त्याचे पालक म्हणाले. आपले गुन्हे कबुल करताना त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता.
बिस्कीट आणि चिप्स खात दिली गुन्ह्याची कबुली..
उलट चौकशी सुरू असताना त्यानं पोलिसांकडे बिस्कीट आणि चिप्सची मागणी केली. बिस्कीट आणि चिप्स खात-खात त्यानं तीन खून कसे केले याचा घटनाक्रम पोलिसांना ऐकवला. सगळं सांगताना मध्येच तो हसतही होता.कारण विचारले असता खून करताना मला मजा वाटत होती असे अमर दिप ने सांगितले.
खेळण्याच्या वयात अमरदीप नावाच्या 8 वर्षाच्या मुलानं तब्बल तीन खून केले. जेव्हा त्याचे गुन्हे उघडकीस आले, तेव्हा तो जगातील सर्वात लहान ‘सिरियल किलर’ ठरला. या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. अमरदीपनं केलेल्या खूनांची माहिती ऐकून भीतीची एक थंड शिरशिरी अंगातून गेल्याशिवाय राहत नाही.
या सर्व प्रकाराने पोलीस खाते गोंधळात पडलं होतं. अमरदीपची तपासणी करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मते अमरदीप एक मनोरुग्ण आहे. त्याला आपण केलेल्या वाईट गोष्टींचा पश्चात्ताप नाही. इतर लोकांच्या त्रासातून त्याला आनंद मिळतो (सेडीस्ट), असा निष्कर्ष मानसोपचार तज्ज्ञांनी काढला आहे. अमरदीपच्या मेंदूत गडबड असून त्याला योग्य किंव अयोग्य याचं काहीच भान राहत नाही.तसेच या अवस्थेला काही आनुवंशिक घटकही जबाबदार असू शकतात असंही सायकोअॅनालिस्ट म्हणाले होते.
अमरदीप अल्पवयीन असल्यामुळं त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी तो तीन वर्ष राहिल्याची माहिती आहे. पुढील सध्या तरी माहिती उपलब्ध नाही. वयानं लहान असूनही, त्यानं अतिशय हुशारीनं खून केले. त्याचे तिन्ही बळी वयानं त्याच्यापेक्षा लहान होते आणि मुली होत्या.
सायकोअॅनालिस्टच्या मते, वयाच्या दुसऱ्या वर्षानंतर लहान मुलांमध्ये ‘सायकोपॅथिक’ रसायन तयार होत त्यामुळे लहान मुलांचं अतिशय काळजीपूर्वक संगोपन करणं गरजेचं आहे आणि हे अमरदीपच्या उदा ने दाखवून दिले आहे.






