Amalner

सामाजिक बांधिलकी जपत राहुलने केला वाढदिवस साजरा.. गरजू महिलेला केले मित्रांनी मिळून रक्तदान..

सामाजिक बांधिलकी जपत राहुलने केला वाढदिवस साजरा.. गरजू महिलेला केले मित्रांनी मिळून रक्तदान..

अमळनेर येथील राहुल कंजर उर्फ आर के ने केला सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा.. राहुल गेल्या अनेक वर्षांपासून आपला वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करतो.आजही एका गरजू महिलेला रक्ताची आवश्यकता असताना आपल्या मित्र परिवारासह रक्त दान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.अमळनेर नगरीत रक्तदानाचे कार्य जोमाने सुरु आहे. रक्ताची भविष्यातही कमरतरता भासणार नाही अस उल्लेखनीय कार्य युवा परिवाराच्या माध्यमातून होत आहे. आज राहुल कंजर याचा वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदानाची चळवळ राबविणारे मनोज शिंगाणे निखील चव्हाण प्रसाद साळी व युवा मित्रांनी रक्तदान करुन अमुल्य भेट देत एक चांगला संदेश समाजाला दिला. एवढच नव्हे डाॕ भूषण पाटील यांच्या कडे साधना या गरीब महिलेस युवा मित्र परिवाराच्या माध्यमातून मदत करण्यात आली. निखील चौव्हाण यांनी युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले तर अमळनेर नगरीला रक्तदात्यांची नगरी अशी ओळख नक्कीच होईल असा विश्वास मनोज शिंगाणे यांनी व्यक्त केला. यावेळी अमळनेर युवा मित्र परिवाराचे तुषार सोनार पारस धाप, भटु विसपुते ,विशाल चौधरी ,बाळा पवार, योगेंद्र बाविस्कर, शंकर पाटील, मयूर पाटील इ. युवा वर्ग उपस्थित होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button