Faijpur

फैजपूर नगरपरिषद कार्यालय वरील गच्चचे साफसफाईचे काम कागदपत्रांवर तर शहरातील किती कामे पारदर्शक आणि किती कामे कागदपत्रावर चौकशीची मागणी

फैजपूर नगरपरिषद कार्यालय वरील गच्चचे साफसफाईचे काम कागदपत्रांवर तर शहरातील किती कामे पारदर्शक आणि किती कामे कागदपत्रावर चौकशीची मागणी सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावलयेथील नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयाचे वरती गच्चीवर पावसाचे पाणी साचत असून त्यामुळे नगरपरिषदेच्या तळमजल्याच्या वेगवेगळ्या विभागात दुर्दशा होत आहे पाणी साचू नये म्हणून नगर पालिकेने मुख्य कार्यालयावरती साफसफाई आणि स्वच्छते साठी हजारो रुपयांचे बिल मात्र वसुलीसाठी सादर केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे गेल्या दोन महिन्यांपासून पावसाळा सुरू झाला असून पावसाच्या सरी सुरू झाल्या आहे आणि नगरपरिषदेच्या गच्चीवर पाणी साचू नये म्हणून आणि प्रत्येक विभाग सुरक्षित राहावे यासाठी नगर पालिकेने वरची गच्चीची साफसफाई व स्वच्छता करावीची होती परंतु नगरपरिषदेने गच्ची स्वच्छ न करता हजारोंची बिल नगरपरिषद कार्यालयात सादर केल्याचे वृत्त आहे त्यामुळे नगर परिषदेच्या प्रत्येक विभागगात पावसाचे पाणी शिरत असल्यामुळे सर्वत्र भिंती ओल्या होतं आहे सदर हा ठेका कोणाच्या नावावर दिला होता का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे मात्र स्वतःमुख्य अधिकारीयांनी बघ्याची भूमिका घेतली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे यांच्या कार्यालावरती गच्चीवर पाणी जिरत असून हे बिल कोणाच्या आशीर्वादाने सादर केले आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे स्वतः नगरपरिषद कार्यालय वरती गच्चीच्या साफसफाई हे हाल असून शहरात अनेक ठिकाणी असे केली जात आहे परंतु त्यामध्ये किती कामे पारदर्शक होत आहे आणि किती कामे कागदपत्रावर होत आहे याची चौकशी करणे आवश्यक असून फैजपूरचे मुख्याधिकारी किशोर चव्हाणहे गेल्या तीन वर्षापासून कारभार सांभाळत आहे त्यांच्या कार्यकाळापासून किती कामे पारदर्शक झाली आहे की नाही याची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button