Nashik

चिटपाखरूही प्रवेश करू न शकणार्या चिरेबंदी ठिकाणी चोरी करन्सी नोट प्रेस नाशिकरोड येथे ५ लाख रुपये चोरी पाचशे रुपयेच्या हजार नोटा चोरीला,

चिटपाखरूही प्रवेश करू न शकणार्या चिरेबंदी ठिकाणी चोरी करन्सी नोट प्रेस नाशिकरोड येथे ५ लाख रुपये चोरी पाचशे रुपयेच्या हजार नोटा चोरीला,

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : अभेध्य सुरक्षा कवच असलेल्या आणि माणूस च काय चिटपाखरूही प्रवेश करू न शकणार्या नाशिक रोङ येथील करन्सी नोट प्रेस मधुन पाचशे रुपये च्या तब्बल एक हजार नोटा चोरीला गेल्या आहेत. कोरोना काळात अहोरात्र काम करून देशाला चलनी नोटा पुरवण्याचे महत्त्वाचे काम करन्सी प्रेस मध्ये सुरु आहे परंतु या प्रकरणामुळे करन्सी नोट प्रेस मधील सुरक्षा पुन्हा वार्यावर आल्याची चर्चा जिल्ह्यात व परिसरात सुरू आहे दिनांक १३/०७/२०२१ रोजी करन्सी नोट प्रेस कडील सहायक प्रबंधक (विधी) श्री अमित सतिष शर्मा, वय २८ वर्षे यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथे समक्ष येवून सांगितले की, करन्सी नोट प्रेस येथुन दिनांक २९/०६/२०२१ रोजी पुर्वी ५ लाख रु किंमतीच्या ५००/- रु दराच्या १००० चलनी नोटा असलेले बंडल चोरी झाले असून ते मिळुन न आल्याने त्यांची सदरच्या नोटा असलेले बंडल चोरीस गेल्याची खात्री झाली असुन त्याबाबत करन्सी नोट प्रेसचे चिफ जनरल मॅनेजर यांनी त्यांना उपनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्याकामी पाठविले असल्याचे सांगितले.

करन्सी नोट प्रेस कडील सहायक प्रबंधक (विधी) श्री अमित सतिष शर्मा, वय २८ वर्षे यांचे तकारी नुसार दिनांक २९/०६/२०२१ रोजीच्या पूर्वी करन्सी नोट प्रेस येथे ५ लाख रू त्यात ५०० रू किंमतीच्या १००० नोटा असलेले बंडल नोट प्रेस मध्ये बाहेरील इसमास कोणत्याही प्रकारचा प्रवेश नसल्याने, पॅकिंग बे सेक्शन अथवा करन्सी नोट प्रेस मधील कोणीतरी अज्ञात प्रेस कामगार, स्टाफ, किंवा सिक्युरीटी यापैकी कोणीतरी चोरून नेले बाबत फिर्याद नोंदवुन घेवुन गुन्हा रजिस्टर नंबर ११४/२०२१ भादवि कलम ३८१ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने श्री. विजय खरात, पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ २ नाशिक शहर, श्री समीर शेख, सहायक पोलीस आयुक्त सो विभाग ४ नाशिक शहर, वपोनि श्री. अनिल शिंदे, तसेच पोनि गुन्हे श्री जाधव उपनगर पोलीस स्टेशन यांनी नोट प्रेस येथे भेट देवून पाहणी करून गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने तपासी अधिकारी सपोनि एस. बी. खडके यांना सुचना व मार्गदर्शन केले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. विजय खरात, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ नाशिक शहर, श्री. समीर शेख, सहायक पोलीस आयुक्त विभाग ४ नाशिक शहर वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे उपनगर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री जाधव उपनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री एस.बी. खडके हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button