Breaking एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना 15 जुलै पर्यंत ED कोठडी.आता तरी खडसे लावतील का सिडी
मुंबई सध्या महाराष्ट्रात ईडी चा धुमाकूळ सुरू असून अनेक दिग्गज नेते,कार्यकर्ते ईडी च्या निशाण्यावर आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना 15 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. भोसरी जमीन घोटाळा संदर्भात चौकशी सुरू असून गिरीश यांना 5 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. चौकशी साठी ईडीने 9 दिवसांची कोठडी मागितली होती परंतु कोर्टाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरण हे गाजत आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, गिरीश चौधरी यांच्या नावाने खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तसेच या प्रकरणी झोटींग समिती देखील नेमण्यात आली होती. त्यानंतर श्री खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू देखील सुरू झाली.
या प्रकरणात एकनाथ खडसेंना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतांना तुम्ही ईडी लावली तर आम्ही सिडी लावू असे श्री. खडसेंनी धमकी वजा इशारा दिला होता.त्यामुळे आता एकनाथराव खडसे काय भूमिका घेतात? खरंच ते आता सिडी लावतील का ? ही नेमकी कोणती सिडी आहे? ह्या सिडीत नेमकं काय आहे?असे एक ना दोन प्रश्न उपस्थित केले होते. आता नेमकी ही सिडी खडसे आता तरी लावणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.






