Rawer

बार्टीचा समतादूतांमार्फत वृक्षारोपण अभियान कौतुकास्पद: केंद्रप्रमुख रईस शेख जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून ते 26 जून सामाजिक न्याय दिवस दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्षारोपण अभियान

बार्टीचा समतादूतांमार्फत वृक्षारोपण अभियान कौतुकास्पद: केंद्रप्रमुख रईस शेख
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून ते 26 जून सामाजिक न्याय दिवस दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्षारोपण अभियान

मुबारक तडवी रावेर

रावेर : बार्टीच्या समतादूतांमार्फत अभियान राबविण्यात येत आहे.
सामाजिक न्याय विभाग व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत रावेर तालुक्यातील कळमोदा येथील उर्दू व मराठी शाळेत वृक्षारोपण अभियान कार्यक्रमात केंद्र प्रमुख रईस शेख अल्लाउद्दीन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान बार्टीचा समतादूतांमार्फत वृक्षारोपण अभियान कौतुकास्पद आहे व कोरोना काळात ऑक्सीजन ची कमतरता ओळखून सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीतर्फे पुर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबविण्यात येत असून कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केंद्र प्रमुख शेख साहेबान्नी केले. बार्टी तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबत समता बंधूता सामाजिक न्याय व संविधानातील मुलभूत तत्वे यावर प्रबोधन कार्यक्रम होत असतात आणि दरवर्षी वृक्षारोपण अभियान राबविण्यात येतात यावर्षी बार्टी 5000 वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन व संरक्षण ही करणार आहे. बार्टी च्या या उपक्रमात सर्व स्तरातील नागरिक, राजकीय, सामाजिक प्रतिनिधी तसेच विद्यार्थ्यांनीही सहभाग घ्यावा असे आवाहन रावेर तालुक्यातील समतादूत युनुस शहादूर तडवी यांनी केले. यावेळेस कार्यक्रमास जि.प.मराठी शाळेचे मुख्याध्यापक सौ.उषा मधुकर इंगळे, सौ.करूणा दिलीप रावते, श्री.हेमचंद्र रामा नेहेते, श्री.मंगेश संतोष महाजन, श्रीमती.सोनाली मारूती चौधरी, श्रीमती. ज्योती धनराज जंगले तसेच उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री. मो. अबुबकर शेख.अबुसईद, श्री.मो. हनिफ शेख. मुसा पिंजारी, शेख. सईदुल्ला शेख.फैजुल्लाह आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button