sawada

माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या घरासमोर घाणीचे साम्राज्य…! सावदा नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्ष

माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या घरासमोर घाणीचे साम्राज्य…! सावदा नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्ष

ठळक मुद्दे

कोरूना काळात स्वच्छता अभियानाचा फज्जा
संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी घाणी चे साम्राज्य
शहराची साफसफाई व स्वच्छता अभियान फक्त कागदांवर
विषारी डास मच्छरांचा तांडव आणि जनतेच्या आरोग्याला मोठा धोका

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात सर्वत्र ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले असून पावसाळ्या पूर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई सुद्धा करण्यात आलेली नाही तसेच गटारीत दुर्गंधीयुक्त पाणी साचलेला असतो या कोरोना काळात “काल मध्ये तेरवा महिना” म्हणून रोग राईला थेट आमंत्रणच पालिकेच्या दिरंगाईमुळे दिला जात आहे की काय? आणि यामुळेच स्वच्छता अभियानाचा फज्जा सुद्धा होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांमध्ये उमटत आहे

याचे बोलके उदाहरण अशी की सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या राहत्या घरासमोर अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात घाण कचरा पडलेला असून त्यावर पाऊस पडल्याने कचऱ्यातून मोठ्याप्रमाणावर भयंकर दुर्गंधी या परिसरात पसरलेली असून रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे
तसेच शहरातील गटारी साफ केल्या नंतर वेळेवर घाण कचरा उचलला जात नाही माजी नगराध्यक्ष व अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या राहत्या घरा समोर दि.७ जून रोजी अकरा वाजेपर्यंत गटारीतून काढलेला घाण कचरा उचलण्यात आला नव्हता. यावरून निदर्शनास येते की संपूर्ण सावदा शहराची काय दुर्दशा असेल पालिकेच्या वतीने शहराची साफसफाई व स्वच्छता अभियान फक्त कागदपत्रांवरच मर्यादित आहे म्हणूनच सावदा नगरपालिकेचा अस्वच्छता मध्ये १०२ क्रमांक यापूर्वी आला होता

पावसाळ्याचे दिवस असून शहरात पसरलेली अस्वच्छता मुळे विषारी डास मच्छरांचा उद्रुक झालेला असून लोकांच्या आरोग्याचा विषय ऐरणीवर आला आहे.

तरी पालिकेचे मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष न करता स्वच्छता अभियान राबविण्यात जलद गतीने पुढाकार घेऊन हा गंभीर प्रश्न मार्गी लावावे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button