अर्थशास्त्राच्या 41 संदर्भग्रंथ व क्रमिक पुस्तकांचे रचेयते प्रोफेसर (डॉ) एन एल चव्हाण यांची सेवापूर्ती
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : आज दिनांक 31 मे 2021 सोमवार रोजी तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथील संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अर्थशास्त्र ग्रंथसंपदा च्या माध्यमातून परिचित असलेले प्रोफेसर (डॉ) एन एल चव्हाण हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने एक मनोगत व सेवाकालपूर्तीच्या अनेकोत्तम शुभेच्छा…..
प्रोफेसर (डॉ) नामदेव लक्ष्मण चव्हाण…शिक्षक आणि लेखक यांचा सुरेख मिलाप.
असं म्हणतात,
या नोकरीत होते बंधन…
मात्र विद्यार्थ्यांच्या नात्यात होता जिव्हाळा …
आणि म्हणूनच साजरा केला पाहिजे शिक्षकांचा सेवानिवृत्ती सोहळा….!
शिक्षक, मास्तर, प्राध्यापक हे फक्त शब्द नसून समाज उभारणीसाठी जीवाच्या आकांताने दिवस-रात्र ज्ञानार्जन करून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात एक सच्चा मार्गदर्शक म्हणून ध्येयप्राप्तीचा आनंद मिळवून देणारा महानायक….
आपण सारेच शिक्षकीपेशाला उदात्त आणि उच्चतम मानतोच.
ज्ञानाचा आणि पावित्र्याचा सागर …
अपूर्णाला पूर्ण करणारा जादूगार …
जगण्यातून जीवन घडवणारा शिक्षक…
आदर्श ज्ञानातून जगाची ओळख दाखवून विद्यार्थ्यांचे अस्तित्व महत्तम करणारा अखंड प्रेरणास्त्रोत म्हणजे शिक्षक.
आज समाजाला विधायक दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांची महती वर्णन करण्याचे कारणही तसे विशेष आहे. फैजपूर सारख्या ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि शैक्षणिक ज्ञान पंढरीत परिसरातील सर्वच जात, धर्म , पंथ आणि संप्रदायाच्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय करून देणाऱ्या तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील ‘अर्थशास्त्र’ विषयात जवळपास 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होणाऱ्या प्रोफेसर (डॉ) एन एल चव्हाण . फैजपुर शहराचा दबदबा सर्वदूर पसरलेला आहेच. कै दादासाहेब धनाजी नाना चौधरी यांच्या त्याग आणि बलिदानातून प्रेरणा घेऊन श्रद्धेय बाळासाहेब मधुकराव चौधरी यांच्या दूरदृष्टीने 1961 मध्ये फैजपूरला उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महाविद्यालयाची स्थापना झाली. हाच संस्कार आणि विचाराचा वारसा पुढे सुरू ठेवीत मा शिरीष दादा चौधरी, आमदार रावेर विधानसभा तळमळीने कार्य करीत आहे. या साऱ्या महनीय व्यक्तीच्या उदात्त हेतूने प्रेरित कर्मभुमीत प्रोफेसर (डॉ) एन एल चव्हाण यांनी आयुष्यात लाभलेल्या संधीचे खरोखर सोने केले.
प्रोफेसर (डॉ) एन एल चव्हाण यांचा अल्पपरिचय :
मूळगाव भडगाव येथून 1987 साली नाशिक येथील नामांकित बिटको महाविद्यालयातील अध्यापनाचा अनुभव सोबत घेऊन फैजपूर ला आपली कर्मभूमी मानली. अर्थशास्त्र सारख्या अत्यंत महत्त्वाच्या तितक्यात जटिल विषयात शैक्षणिक अहर्ता सोबतच पीएचडी ही शिक्षण क्षेत्रातील उच्चतम पदवी संपादन करून मार्च 2019 मध्ये उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रोफेसर या पदावर पदोन्नती मिळवून सरांनी स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. विद्यार्थी प्रिय, अभ्यासू शिक्षक, 41 संदर्भग्रंथाचे लेखक, अध्यापन तंत्राचे आदर्श उदाहरण, स्वतःच्या वक्तशीरपणातून विद्यार्थी आणि सहकार्यांच्या मनावर छाप सोडणारा अवलिया माणूस, स्वभावाने मृदु मात्र कामाच्या बाबतीत अत्यंत अचूक आणि तितकाच कठोर, गेल्या 34 वर्षापासून अध्ययन -अध्यापनातून विद्यार्थ्यांचा आदर्श असणारा शिक्षक म्हणजे प्रोफेसर (डॉ) एन एल चव्हाण.
जिनका सिर्फ नाम ही काफी है..। असे उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या संदर्भ ग्रंथातून परिचित चव्हाण सर. अर्थशास्त्राचे शिक्षक , विभाग प्रमुख, जवळपास 2500 शिक्षण प्रेमी जीवांना दैनंदिन काम सांभाळून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय करून देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे महाविद्यालय अभ्यास केंद्र स्थापने पासून ते सेवा निवृत्तीच्या काळापर्यंत एकूण 15 वर्ष केंद्र संयोजकाची भूमिका, परिसरातील स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देणाऱ्या कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीचे 2008 ते 2015 दरम्यान समन्वयक, विविध कंपन्यांना महाविद्यालयात प्लेसमेंट साठी बोलवून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणारे प्लेसमेंट ऑफिसर हे सरांच्या कारकिर्दीतील काही बलस्थाने. अध्ययन अध्यापन सांभाळून वेळोवेळी संस्था आणि महाविद्यालयाने सोपविलेली जबाबदारी सर्वार्थाने पार पाडून अहोरात्र मेहनतीने 2003 पासून संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा अर्थशास्त्रा वरील विविध क्रमिक व संदर्भ ग्रंथाचे लेखन करून संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या महाविद्यालयाचा व आपला ठसा उमटविला. यासोबत तीन विद्यापीठस्तरीय आणि एक राष्ट्रीय 41 वे अखिल भारतीय अर्थशास्त्र तीन दिवसीय परिषद यशस्वीपणे आयोजित करून महाविद्यालयाच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सोबतच ‘ग्रामीण विकास’ या विषयावर लघु संशोधन प्रकल्प पूर्ण करून परिसरातील ग्रामीण व आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मौल्यवान संशोधन केले. समाजाला भेडसावणाऱ्या विविध विषयांवर लेखन आणि संशोधन यांच्या माध्यमातून 26 शोधनिबंधाचे सादरीकरण आणि 40 पेक्षा जास्त परिषदा, कार्यशाळा आदि मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विषय ज्ञान देण्यासोबतच जळगाव, धुळे , अमळनेर, अकोला आदी ठिकाणांच्या महाविद्यालयातही विषयतज्ञ म्हणून महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे आणि या साऱ्यात विशेष म्हणजे आपल्या अध्यापनाची मर्यादा वर्गाच्या चार भिंती पूर्ती सीमित न ठेवता परिसरातील गरीब, वंचित आणि दुर्लक्षित घटकाला उभारणी देण्यासाठी स्वतःच्या ज्ञानाचा यथायोग्य उपयोग केला.
विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षकाला सेवाकाळपुर्तीच्या शुभेच्छा…
समाजामधील अत्यंत आदराचे मात्र तितकेच जबाबदारीचे क्षेत्र म्हणजे शिक्षकी पेशा. स्वचारित्र्य , परिवार आणि नातेवाईक यांना सांभाळून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात स्वप्नपूर्तीचा आनंद निर्मितीत मोलाचा सहभाग देणारे धनाजी नाना महाविद्यालयाचे सर्वांचे आवडते प्रोफेसर (डॉ) एन एल चव्हाण. आयुष्यातील क्षण न क्षण सत्कारणी लावून विद्यार्थी आणि समाजासाठी झिजणाऱ्या सरांना आरोग्यदायी आणि आनंददायी सेवाकाल पूर्तीच्या अनेकोत्तम शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे.
किसी ने क्या खूब कहा है, खूबसूरत साज बनाने के लिए सुर बनाता हू ।
मै नव सिखे परिंदों को बाज बनाता हू।
खामोशीसे सुनता हु शिकायते दुनिया की ।
तभी तो दुनिया को बदलने की आवाज बनता हू।
समंदर परखता है हौसले कस्तियोके ।
मै उनही तुटी कस्तियोसे जहाज बनाता हू।
और चाहे जमाना बनाले चांद पर बुर्जखलिफा ।
मै कच्ची इटो से ही ताज बनाता हू।
अशा रीतीने विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद, यश, कीर्ती आणि समाधान पेरणाऱ्या विद्यार्थीप्रिय आदर्श प्रोफेसर (डॉ) एन एल चव्हाण यांना सेवाकाल पूर्ती निमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा आणि पुढील काळात निरामय आरोग्यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना…!
शब्दांकन : लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत
सहाय्यक प्राध्यापक,
इंग्रजी विभाग
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर.






