चांदवडला नियमित पाणी पुरवठा होणेसाठी नागरिकांच मुख्याधिकारी कदम यांना निवेदन
उदय वायकोळे चांदवड
चांदवड शहरातील वरचेगावातील प्रभाग क्र.९,१०,३,मधील लोहरगल्ली,हत्तीखाना,ब्राम्हणगल्ली,पाटणी गल्ली,डांबरी विहीर परिसर,पंचशीलनगर,बागवानपुरा,देवीरोड,शिंपी गल्ली,हनुमान नगर,बोरसे गल्ली,रंगमहाल परिसर येथे गेल्या १५-१५ दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.वरचे गावातील पाण्याचे स्रोत कमी असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.तसेच सध्या कोरोना महामारीत हातपंपावर महिलांना पाणी भरण्यासाठी गर्दी करावी लागत आहे.त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण तातडीने उपाय योजना करून वरचेगावतील पाणीपुरवठा ४-५ दिवसावर करावा.तरी आपण तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन नियमित पाणी पुरवठा करावा.याउपरही आपण काही उपाययोजना केल्या नाही तर शिवसेना व वरचे गावातील सर्व नागरिक तीव्र स्वरूपाच आंदोलन करतील त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.असे निवेदनात म्हंटले आहे. सदर निवेदनावर श्री.सचिन (गुड्डू) खैरनार,शिवसेना उप-शहरप्रमुख चांदवड,श्री.अँड.विशाल व्यवहारे,श्री.गणेश जगताप,श्री.रुपेश अजमेअर श्री.गणेश लहरे,श्री.गणेश खैरनार,श्री.सागर बर्वे,भूषण कोकंदे श्री.राजेंद्र आहेर,श्री,संजय जाधव,श्री.संदिप पवार,श्री.योगेश बोरसे,श्री.राजा सोमवंशी,इत्यादी नागरिकांच्या सह्या आहे.






