कोरोनाकाळात कार्य करणाऱ्या योद्द्यांचा सन्मान करणे गरजेचे-आ शिरीष चौधरी.
निंभोरा प्रा आ केंद्रात आ शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क,सॅनिटायझर साहित्य वाटप.
संदिप कोळी रावेर
रावेर : रावेर-यावलचे आ.शिरिष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त निंभोरा येथे आ.शिरिषदादा मित्रपरिवारातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रात सिमेंटच्या बाकांचे लोकार्पण व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पोलीस ठाण्यासाठी सॅनिटायझर,मास्क व हातमोजे आ.शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच कोरोना काळात विशेष काम करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील,डॉ चंदन पाटील, डॉ मोनिका चौधरी यांच्यासह सर्व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा तसेच ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील,सरपंच सचिन महाले,निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्नील उनवणे यांचा ही सन्मान करण्यात आला.यावेळी आ.शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा आ केंद्रात सिमेंटचे बाक देणाऱ्या प्रल्हाद बोंडे,डॉ एस डी चौधरी,गुणवंत भंगाळे,ग्रा पं सदस्य शेख दिलशाद सर,मधुकर बिऱ्हाड़े, चंद्रकांत खाचणे यांसह निंभोरा पोलीस ठाण्यातर्फे सपोनि स्वप्नील उनवणे यांनीही सिमेंट बाक रुग्णांच्या सोयीसाठी भेट दिले म्हणून त्यांचा ही सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद बोंडे होते. यावेळी बोलताना आ शिरीष चौधरी यांनी कोरोना काळात तालुक्यातील आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाचे कौतुक करीत वाढदिवसावर विनाकारण खर्च न करता सहकाऱ्यांनी समाजहितासाठी असा निधी खर्च केल्याबद्दल आभार मानले.यावेळी सपोनि उनवणे व प्रल्हाद बोंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमास ज्ञानदीप विकास मंडळाचे अध्यक्ष गिरधर भंगाळे, माजी पं स सदस्य प्रमोद कोंडे,ग्रा पं सदस्य सतीश पाटील,स्वप्नील गिरडे,मधुकर बिऱ्हाड़े,गिरीश नेहेते, प्रशांत पाटील,नंदपाल दूध संस्थेचे चेअरमन सुधीर मोरे,दस्तगिर खाटीक,युनूस खान,विवेक बोंडे,काशिनाथ शेलोडे,चंद्रकांत चौधरी,संदीप महाले,धनराज खाचणे,राकेश वराडे,राजीव बोरसे, आशिष बोरसे,दिलीप सोनवणे,चंदन पाटील,शोएब खान,युनूस खान,राज खाटीक,नवाज पिंजारी,किरण कोंडे,विशाल तायडे,गणेश खाचणे,राकेश सपकाळे, यांसह आरोग्य विभागाचे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचालन दिलशाद शेख,प्रास्ताविक व कार्यक्रमाचे आयोजन सुनील कोंडे यांनी तर आभार प्रदर्शन विवेक बोंडे यांनी केले.






