India

?महत्वाचे… जाणून घ्या म्युकरमायकोसिस आजाराची काय आहेत लक्षणे..!AIMS ने जाहीर केली नियमावली..!

?महत्वाचे… जाणून घ्या म्युकरमायकोसिस आजाराची काय आहेत लक्षणे..!AIMS ने जाहीर केली नियमावली..!
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना ब्लॅक फंगस (Mucormycosis) या आजाराने आणखी डोकेदुखी वाढवली आहे. देशाच्या विविध भागातून रुग्णांची संख्या पुढे येत आहे. काही ठिकाणी ब्लॅक फंगसमुळे (Black fungus) रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रात ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, राजस्थानसहित अन्य राज्यांत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर एम्स (AIIMS)कडून नवी नियमावली प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे आणि त्याला रोखण्यासाठी वेळीच उपाय करण्यासाठी मदत होईल. तसेच ब्लॅक फंगसची शिकार होईल, असे जे रुग्ण असतील, त्यांची वारंवार तपासणी करा, अशा सूचना एम्सने डॉक्टरांना दिल्या आहेत.

  • ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, आणि जे स्टेरॉइड किंवा टोसिलिजुमैब इंजेक्शनचा वापर करत आहेत, त्यांना ब्लॅक फंगसचा सर्वात जास्त धोका आहे.
  • तसेच ज्या व्यक्ती कर्करोग (Cancer) वरील उपचार घेत आहेत, किंवा खूप दिवसांपासून एखाद्या आजाराने ग्रासलेले आहेत, त्यांनाही धोका आहे.
  • कोरोनामुळे जे रुग्ण ऑक्सिजन मास्क किंवा व्हेंटिलेटरवर आहेत, अशा रुग्णांनाही ब्लॅक फंगसची लागण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांची देखभाल करणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना ब्लॅक फंगसची लक्षणे ओळखणे सोपे आहे.

  • नाकातून रक्त येणं, डोक्यात घाण जमा होणे
  • नाक बंद होणे, डोके आणि डोळे दुखणे, डोळ्यांभोवती सूज येणे, अस्पष्ट दिसणे, डोळे लाल होणे, पापण्यांची उघडझाप करण्यात अडचण येणे
  • चेहरा सुन्न पडणे, खाज सुटणे
  • तोंड उघडण्यात तसेच अन्न चावण्यात अडचणी निर्माण होणे

वरील पैकी कोणती लक्षणे दिसत आहेत का, हे दररोज पडताळून पाहा.
एखाद्या व्यक्तीला ब्लॅक फंगसची लागण झाली किंवा लक्षणे दिसू लागली की काय करावे, याबाबत एम्सने माहिती दिली आहे.

  • कोणत्याही डॉक्टरशी संपर्क साधा. डोळ्यांचे तज्ज्ञ किंवा डोळे, त्वचा आणि संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे जा.
  • दररोज उपचारांचे अनुसरण करा. जर आपल्याला मधुमेह असेल, तर रक्तातील साखरेचे परीक्षण करा.
  • इतर कोणताही आजार असेल, तर नियमित औषधे घ्या आणि परीक्षण करा.
  • स्टेरॉइड किंवा इतर कोणतेही औषध घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करा.
  • डॉक्टरांनी सांगितल्यानंतर एमआरआय आणि सीटी स्कॅन करा. नाक-डोळ्यांची तपासणी देखील आवश्यक आहे.

दरम्यान, ब्लॅक फंगसचे रुग्ण उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये आढळून आले आहेत. दिल्लीतील मॅक्स, एम्स, सर गंगाराम आणि मूलचंद हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक रुग्ण दाखल आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button