Mumbai

? Big Breaking… पदोन्नती आरक्षण रद्द निर्णयास स्थगिती..राज्य सरकारचा मोठा निर्णय…

? Big Breaking… पदोन्नती आरक्षण रद्द निर्णयास स्थगिती..राज्य सरकारचा मोठा निर्णय…

मुंबई : पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय आज घेतला. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद निर्माण झाला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला.या निर्णयामुळे खूप मोठ्या टीकेला सरकारला सामोरे जावे लागले म्हणून महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे घेत ह्या निर्णया ला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने जीआर काढत राज्य सरकारने आरक्षणाशिवाय सेवा जेष्ठते नुसार कोट्यातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता.

पदोन्नती होत नसल्याने असलेली नाराजी दूर करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. 25 मे 2004 च्या सेवा ज्येष्ठतेच्या स्थितीनुसार रिक्त जागा भरण्यात येतील असं सरकारने म्हटलं होतं. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल त्यानुसार मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं राज्य सरकारने जीआरमध्ये म्हटलं होतं.

मात्र पदोन्नती आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती. याशिवाय काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पदोन्नीतील आरक्षणावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत आज पदोन्नती आरक्षणाचा निर्णय बदलविण्यात आला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा न करताच 7 मे रोजीचा जी आर जाहीर झाल्याने वाद निर्माण झाला होता. सरकारनं 7 मे रोजीच्या जीआरची सध्या अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतल्याची‌ माहिती मिळाली आहे. या विषयावर पुन्हा विधी आणि न्याय विभागाचे मत मागविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button