?️ अमळनेर कट्टा… मुडी प्र.डा येथे १६० नागरिकांना लसीकरण
अमळनेर – तालुक्यातील मुडी प्र.डा.येथील नागरिकांनी गावात लसीकरणा संबंधी अमळनेर तालुका वैद्यकीय अधिकारी गोसावी यांच्याकडे मागणी केली होती. अखेर मागणी पूर्ण होऊन १६० नागरिकांना लसीकरण केले.व लसीकरण विकेंद्रीकरणा मुळे अनेक नागरिकांची पायपीट वाचली व अनेकांना याचा लाभ झाला व लसीकरण मोहीम सुरळीत पार पडली.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव उदय पाटील यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण व्हावे अशी मागणी केली होती.व याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला अनेक ज्येष्ठ नागरिक व अपंग बांधव यांना गावातल्या गावात लसो मिळाल्यामुळे होणाऱ्या हालअपेष्टा थांबल्या तसेच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. लसीकरणासाठी डॉक्टर नीलेश जाधव, डॉक्टर जोगी, डॉक्टर श्रीमती एस डी राजपूत,डॉ एम आर धनगर , श्रीमती एम एस परदेशी, एन पी कदम, आर एस पाटिल,के डी चौधरी, भूषण कोळी, श्रीमती वैशाली पाटिल व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांनी मदत केली.
लसीकरणाकिच्या वेळी सरपंच काशीनाथ माळी, ग्रा वि शि चे संचालक सुनील राजधर पाटील,तुषार पाटील, गुणवंत पाटील, महेंद्र पाटील, पी एम सोनवणे,प्रमोद पाटील, शुभम पाटील, प्रमोद पाटील, विलास मोरे आदी नागरिक उपस्थित होते लसीकरण मोहीम सुरळीत होण्यासाठी तरुणांनी हातभार लावला व गावातील नागरिकांनी सहकार्य केले. तसेच लसीकरणाला मदत करणाऱ्या सर्व घटकांचे आभार आले.






