?Big Breaking.. CBI चौकशीमध्ये अनिल देशमुख यांचा धक्कादायक खुलासा
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी वसुलीची आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. परंतु, चौकशीत अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुख सीबीआय चौकशीला हजर झाले आहे. गेल्या 7 तासांपासून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. आणखी काही तास ही चौकशी सुरू राहणार आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
आपल्यावरील लावण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा देशमुखांनी दावा केला आहे. महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न आहे, असा आरोपही देशमुख यांनी केली.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल अनेक प्रश्न विचारले. पण “मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’ अशी उत्तर अनिल देशमुख यांनी दिली.
मुंबई स्फोटकांनी गाडी सापडली या प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी पत्र लिहले आहे. कारमायकल रोड गाडी प्रकरणी ATS ने केलेल्या तपासानुसार परमबीर सिंग यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. डीसीपी राजू भूजबळ आणि एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात स्पष्ट केलंय. मी त्यांना कोणतीही वसुली करायला सांगितले नाही, असंही देशमुख यांनी सांगितले आहे.






