Mumbai

?मोठी बातमी : राज्यात लॉकडाऊन लागला तर कधी पासून लागेल ? काय राजेश टोपे म्हणाले..

?मोठी बातमी : राज्यात लॉकडाऊन लागला तर कधी पासून लागेल ? काय राजेश टोपे म्हणाले..

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. यामुळे सरकारने राज्यात विकेंड लाकडाऊन लावला आहे. मात्र राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची चर्चा आहे. संपूर्ण लॉकडाऊनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं आणि मोठं वक्तव्य केलं आहे.
गरीब घटकांना काही आधार देता येईल का अशा गोष्टींचा विचार करुन लॉकडाऊन करण्याबाबतचा निर्णय होईल. येत्या दोन-तीन दिवसात मंत्रीमंडळाची बैठक होईल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
सध्या राज्यात ऑक्सिजनचाही तुटवडा नाही. सर्व ऑक्सिजन मेडिकलसाठी उपलब्ध आहेत. सर्व संसाधने योग्यपणे मिळवण्यासाठी आपण पूरेपर प्रयत्न करतोय. पण राज्यात ज्याप्रमाणे दररोज रुग्णांचा आकडा वाढतो आहे. अशीच रुग्णवाढ कायम असली तर लॉकडाऊन लावा लागू शकतो, अशी मनस्थिती काल जवळपास सगळ्यांची तयार झाली आहे.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात कोणताही संघर्ष नाही. आम्ही एकत्र आहोत, असंही राजेश टोपेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button