Nashik

शिवसेना दिंडोरी तालुकाप्रमुख पदी पांडुरंग गणोरे

शिवसेना दिंडोरी तालुकाप्रमुख पदी पांडुरंग गणोरे

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : शिवसेनेच्या दिंडोरी तालुकाप्रमुख पदी कट्टर शिवसैनिक पांडुरंग गणोरे यांची निवड करण्यात आली आहे, तसेच उपजिल्हाप्रमुख पदी कैलास पाटील व नाना मोरे यांच्या निवडीचे पत्र शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत, समनव्यक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, यांनी गणोरे यांना दिले,
जन्मजात शिवसेनेशी नात असणारे पांडुरंग गणोरे हे १९९६ साली शिवसेना शाखेच्या विध्यार्थी सेनेचे शाखाप्रमुख झाले, त्या शाखेत कट्टर शिवसैनिकांची फळी तयार करुन संघटनेचे काम करत पक्ष कार्य केले, त्यानंतर २००५ साली विभागप्रमुख, २०१० साली उपतालुकप्रमुख व २०१९ ला नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून गणोरे यांची नियुक्ती झाली, पक्षाचे सर्व आदेश मानुन काम करताना अनेक तरूण पक्षाशी जोडण्याचे व टिकवण्याचे काम त्यांनी केले, यासाठी पक्ष नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, पक्षाबंधणीचे चांगले काम केले, याची पक्षनेत्यांनी दखल घेऊन गणोरे यांच्यासारख्या तरूणाला तालुकाप्रमुख पदी काम करण्याची संधी बहाल केली आहे, त्यांच्या निवडीचे माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर, सुरेश डोखळे, सतीश देशमुख, आदींनी स्वागत केले, फोटो –

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button