?️अमळनेर कट्टा…निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केली प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी..!
अमळनेर(प्रतिनिधी) निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी अमळनेर शहरातील प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या समवेत पाहणी करून आढावा घेत सूचना दिल्या आहेत.
उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिवसभरात कोरोना रुग्णांच्या प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी केली यात न्यू प्लॉट,तांबेपुरा, आययुडीपी कॉलनी,मेघनगरी येथील प्रतिबंधित क्षेत्रात त्यांनी भेटी दिल्या.तसेच कुटुंबियांची चौकशी करून सूचना दिल्या आहेत.याआधी कोरोना बधित असलेला पूर्ण परिसर,कॉलनी सील करण्यात येत होती.तर आता नवीन नियमावली नुसार कोरोना रुग्ण असलेले घरे सील करून ते प्रतिबंधित क्षेत्र असते.या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी रुग्ण तसेच कोरेन्टाईन आणि संशयित यांच्याशी संवाद साधला.अडचणी जाणून घेतल्या.
नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे तसेच आरोग्य पथकाला
तपासणीबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.यावेळी
उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र शेलकर,आशा वर्कर्स उपस्थित होते.






