Mumbai

?Big Breaking..रात्री उशिरा सचिन वाझे यांना अटक..! 13 तास चालली चौकशी..!वाझें च व्हाट्सएप स्टेटस विचारात पडणार..!

?Big Breaking..रात्री उशिरा सचिन वाझे यांना अटक..! 13 तास चालली चौकशी..!

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आलीय.13 मार्च शनिवार सकाळपासून सचिन वाझेंची एनआयएकडून चौकशी सुरू होती, अखेर चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आलीय. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. अखेर NIA च्या प्रदीर्घ चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक केलीय.

सचिन वाझेंची 13 तास चौकशी…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (NIA) तब्बल दहा तास चौकशी झालीय. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, मी धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एनआयएला दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचीही चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आलेय. यानंतर सचिन वाझेंची एनआयएने दहा तास चौकशी केली. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून एनआयएच्या चौकशीला सामोरे गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला

विशेष म्हणजे एपीआय सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अखेर एनआयएनं त्यांना अटक केलीय. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे API सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. या प्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे.

कोर्टाने काय म्हटलंय?

सचिन वाझे यांच्यावर अटकेची तलवार आहे. जामीन फेटाळताना कोर्टाने स्पष्ट म्हटलंय, “त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे.” सचिन वाझे यांनी काल न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला. ज्याला कोर्टाने नकार दिला होता.

सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते.

सचिन वाझे यांची बदली

सचिन वाझे हे यापूर्वी मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मात्र, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे आता त्यांना CFC विभागात टाकून साईडलाईन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button