?Big Breaking..भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर!
अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. भैय्यू महाराज यांच्या गाडीवरील ड्रायव्हर कैलाश पाटील याने फेर चौकशीत नवीन माहिती दिली आहे. भैय्यू महाराजांच्या गाडीत जीपीएस सिस्टम लावलेली होती, असा गौप्यस्फोट कैलाश पाटीलने केला आहे. या माध्यमातून गाडी कुठं-कुठं जाते याची माहिती घेण्यात येत होती, असा गौप्यस्फोट कैलाशने केला आहे. या प्रकरणात फिर्यादीच्या वकिलाने ड्रायव्हर कैलाशला पुन्हा साक्ष नोंदविण्यासाठी बोलविण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या प्रकरणाची 15 मार्चला सुनावणी होणार आहे. महाराजांचा सेवक शेखर याला देखील याच दिवशी बोलविण्यात आले आहे. या प्रकरणात आतार्यंत 25 जाणांचा जबाब नोंदविण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 6 महिन्यात संपविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सुनावणी वेगात होत आहे.






