sawada

उपाध्यक्ष सलीम खान यांची संस्थे मधुन कायमची उचलबांगडी करा सावदा येथील पालक वर्ग व नागरीकांची निवेदनाद्वारे मागणी

उपाध्यक्ष सलीम खान यांची संस्थे मधुन कायमची उचलबांगडी करा सावदा येथील पालक वर्ग व नागरीकांची निवेदनाद्वारे मागणी

युसूफ शाहा सावदा

सावदा : जळगांव जिल्हयातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इत्तेहाद सोसायटीने नविन अदयावत इमारत बांधुन शाळा करीता उपलब्ध करून दिली या करीता हातभर लावण्या ऐवजी संस्था व शाळेला अडचणित आणण्यासाठी कोणतेच विचार व भान न ठेवता संस्थेत असलेले संचालक तथा उपाध्यक्ष सलीम खान अ रज्जाक खान यांनी स्वत: इमारत बांधकाम पाडण्या करिता मा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती

दि २२/०२/२०२१ रोजी मा उच्च न्यायालयाने सदरील याचिकेत मांगणी केल्या प्रमाणे प्रतिवादी ऐवजी याचिकाकर्ता सलीम खान यास समजावुन म्हटले की जर तर अवैध बांधकाम सुरू असेल न,पा कारवाई करेल सदरील आरोपित बांधकाम व अतिक्रमणशी तुमचे संबध नाही असे आधिच आपण प्राप्त नोटीसा़ंचे खुलासे दिल्याने या बाबत फिकिर करण्याची गरज नाही व तसेच त्यांनी दाखल केलेली याचिका कोणतेही दंड न आकारता (Disposed) रद्द केली, फेटाळली, बंद केली आहे
पंरतु सदरील रद्द डिस्पोज याचिकातील मुद्यांचा स्वत: ला हवे असलेले अर्थ लावून तसी मानसिकता ठेवुन नुकतेच प्रेस कॉन्फ्रन्स घेवुन वाटेल ते रद्द याचिका चा आधार घेऊन संस्था आणि शाळा विरोधी भुमीका मांडली व या बाबत स्वत: कबुली दिली यामुळे त्यांची ही विघ्नसंतोषी प्रवृत्ति व भुमीका पाहुन सावदा येथील पालक वर्ग व सुज्ञ नागरिकांनी शाळेच्या भूतकाळ,वर्तमानकाळ, व विशेषकर भविष्य समोर ठेवून बदल व विकासासाठी कार्य करणाऱ्या संचालकांना प्रधानय देवून थेट संस्थेत ३० वर्षाहुन अधिक काळा राहुनही शाळेच्या विकास व प्रगती न करता यांच्या कालखंडत उलट शाळा पडाऊ पत्री इमारत मध्य दोन शिफ्ट मध्ये सुरु होती विद्यार्थ्यांना फार त्रास सहन करावे लागायचे कोणतीही सुविधा न होती मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह न होते मुलांसाठी सुविधा न होती परिणामी शाळा फक्त कागदांवर उरलेली होती यास जिवदान देण्या ऐवजी विनाशक मार्ग वर घेवून जाणारे
सलीम खान सर यांची कायम स्वरुपी संस्थेतून, उचलबांगडी करण्यात यावी अशी मागणीच्या दिलेल्या निवेदनावर पालकां सहीत नागरिकांच्या सह्या केलेल्या दिसत आहेत
इमारत संदर्भात गावातील ज्या समाजसेवक नागरिकांनी गैर समज वरुन बांधकामा बाबत नगर पालिकेत तक्रारी केल्या होत्या त्यानी शाळा, विद्यार्थ्याी हितासाठी तक्रारी मागे घेतल्या आहे व ते आता संस्थेला विकासासाठी साथ देत आहे याच राग येवुन की काय श्री सलीम खान निर्माण ऐवजी विनाश करण्यासाठी उत्सुक दिसुन येत आहे

*सलीम खान यांनी पत्रकार परिषद नंतर पालक वर्ग व सुज्ञ नागरिकांना पडलेघले , प्रश्न*

अशीच मानसिकता मुळे त्यांना संस्थेत मान सम्मान मिळत नाही ते उलट सुलट आरोप करुन संस्थेला अडचणित आण्ण्याचे कार्य नेहमीच करत असतात
त्यांनी व माजी अध्यक्षांनी ५नोव्हेंबर २०१८ ला त्याच जागेवर इमारत बांधकामाठी भुमिपुजन कार्यक्रम मा मंत्री एकनाथ रावजी खडसे यांचे हस्ते केले होते त्या वेळेला परवॎनगी घेतलि होती काय?
काम का बंद केले ?
३० वर्षात तुम्ही इमारत का बांधली नाही?
शाळेची इमारतचा नुकसान झाले तर तुम्ही बांधु शकाल का ?
समाचे नुकसान तुम्ही भरुन काढणार का?
नगर पालिकेने यांची मांगणी फेटाळुन लावावी अशी प्रतिक्रिया नागरिकांची आहे तसेच
समाजाहिता साठी, विद्यार्थ्याीहिता साठी ते आता घातक असुन त्यांची संस्थेमधुन संचालक व उपाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करावी गावात यांचा बद्दल संतापाची लाट पसरली आहे अशे लेखि निवेदनात नागरिकांनी संस्थेला कळविले आहे

या बाबत संचालक मंडळाशी संपर्क साधले असता त्यांनी या बाबत लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असुन अधिक बोलण्यास टाळले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button