Chandrapur

?धक्कादायक..शासकीय योजनेच्या नावावर तब्बल 50 शेतकऱ्यांची फसवणूक ; बनवल्या बनावट पावत्या

?धक्कादायक..शासकीय योजनेच्या नावावर तब्बल 50 शेतकऱ्यांची फसवणूक ; बनवल्या बनावट पावत्या

गडचांदुर (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील जवळपास ५० शेतकऱ्यांकडून सबसिडी योजनेचे आमिष दाखवून प्रत्येक शेतकऱ्यांकडून १४ ते १५ हजार रुपये घेऊन लक्ष्मीकांत नानाजी मेश्राम हा फरार झाला असून त्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
कोरपना तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून अनेक शेतकरी शासकीय योजनेच्या लाभातून काही सूट मिळाल्यास आपल्याला हातभार होईल अश्या हेतुतून सबसिडी योजनेत अर्ज सादर करतात अश्याच प्रकारे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शासकीय योजनेतून आपल्या शेतात लागणाऱ्या वॅल कंपाऊंड तार आणि इतर योजनेची माहिती देऊन शेतकऱ्यांकडून पैसे लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.
श्री लक्ष्मिकांत नानाजी मेश्राम पोंभुर्णा येथील रहिवासी असल्याचे त्यांनी शेतकऱ्याला सांगितले होते महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ अकोला मार्फत शेतकर्‍यांना मिळणार्‍या योजनेची आमिष दाखवून बनावट पोच पावती व फॉर्म देऊन प्रत्येक शेतकर्‍यांकडून प्रत्येकी १२ ते १५ हजार अशी रक्कम घेऊन पसार झाला आहे त्यांनी दिलेल्या पावत्या बऱ्याच सारख्या क्रमांकाच्या सुद्धा आहे.
काही दिवसानंतर शेतकऱ्यांना योजना तर मिळाली नाही आणि व्यक्ती पसार झाल्याची माहिती मिळाली मोबाईल क्रमांक बंद येत होता शेतकऱ्यांनी मूल येथील महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ कार्यालयात गेलो असतं असा कुठलाही व्यक्ति आमच्याकडे कार्यरत नसून आम्ही याला ओळखत नाही अशी माहिती मिळाली. साहेब शेतकर्‍यांची परिस्थिति पूर्वीच हालाकीची असतांना ऐन हंगामाच्या परिस्थितीत शेतकर्‍यांकडून १२ हजार रुपये योजनेच्या नावर लंपास करणे म्हणजे नकटीच्या लग्नात सतरासे विघ्न अशी परिस्थिती झाली आहे. तालुक्यातील ४० ते ५० शेतकऱ्यांची फसवणूक करणार्‍या इसमाला शोधून कायदेशीर कारवाही करून आम्हा शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे
गेल्या कित्येक दिवसापासून आम्हांला योजना देणार असे सांगू पैसे घेतले परंतु पैसे आणि योजना दोन्ही मिळाल्या नाही तशी तक्रार पोलिसात देण्यात आली.
महेश राऊत
शेतकरी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button