?आताची मोठी बातमी..एमपीएससीने आजपासून उमेदवारांसाठी सुरू केली ‘ही’ नवीन सुविधा..!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने शंका निवारणासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यभरातून दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा हजारो उमेदवार देत असतात. त्यामुळे अशा स्पर्धापरीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी खास सुविधा उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या अडचणी, शंका निवारणासाठी एमपीएससीकडून टोल फ्री- हेल्प डेस्क सुविधा सुरू करण्यात आली आहे. आयोगाकडून 1800-1234-275 आणि 1800-2673-889 या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्रची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. तर या टोल फ्री क्रमांकावर शंकाचे निवारण करण्यात येणार आहे.
हे टोल फ्री क्रमांक 2 मार्च 2021 पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते रात्री 8 आणि शनिवार व रविवारी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत कार्यान्वित राहणार आहे.
तसेच टोल फ्री क्रमांकाच्या सुविधेव्यतिरिक्त उमेदवारांना [email protected] या ईमेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे.






