प्रज्ञाबोधी साहित्य अकादमीच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण मंध्ये रंगले ‘परिवर्तनवादी’ कवी संमेलन

कल्याण प्रतिनिधी
मिलिंद जाधव
प्रज्ञाबोधी साहित्य अकादमीच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘परिवर्तनवादी’ कवी संमेलनाचे आयोजन दिनांक २८ सप्टेंबर रोजी कल्याण येथील बुद्धभूमी फाऊंडेशन वालधूनी येथे सायंकाळी ४ वाजता करण्यात आले होते.

यावेळी कवी, साहित्यिक पी. एस. साळवे यांच्या अध्यक्षतेखाली ‘परिवर्तनवादी’ कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर, साहित्यिक चंद्रशेखर भारती, कवी समलेन अध्यक्ष पी.एस. साळवे, डी एल. कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, कवी मधुकर घुसळे, प्रा. युवराज मेश्राम उपस्थित होते.
नवीन कवी, साहित्यिकांना आपले विचार कवितेच्या माध्यमातून मांडता यावे, म्हणून त्यांना आम्ही विचारमंच उपलब्ध करून दिला होता. लवकरच प्रज्ञाबोधी साहित्य अकादमीच्या वतीने कवितालेखन,कादंबरी लेखन वैचारिक साहित्य या बद्दल आम्ही कार्यशाळा घेणार असून नवीन कवी व उद्याचे साहित्यिक जन्माला घालणार आहोत असे साहित्यिक चंद्रशेखर भारती यांनी प्रास्ताविकेत मांडले.
कविता ही परिवर्तनावादी असावी, जेणेकरून त्या कवितेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होईल असे कवी संमलेन अध्यक्ष पी.एस. साळवे यांनी बोलतांना सांगितले.
आई वडिलांना देव माना, वस्तुतीथी बघा, चुका दाखवून द्या, तुमच्या बुद्धीला वाटेल तेच करा असे साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी पत्रकारितेचे प्रशिक्षण प्राप्त केल्याबद्दल रविप्रकाश ठोंबरे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी कवी संमेलन अध्यक्ष साहित्यिक पी. एस. साळवे, साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, साहित्यिक चंद्रशेखर भारती, साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, मधुकर घुसळे, राजरत्न राजगुरु, शाम भालेराव, मनिषा मेश्राम ,वसंत हिरे, मिलिंद जाधव, नवनाथ रणखांबे,जगदेव भटू, रविप्रकाश ठोंबरे,विजयकुमार भोईर, सुरेखा गायकवाड,प्रज्ञेश सोनावणे,विकास भंडारे,वृषाली माने,प्रविण खोळंबे,प्रविण वाघमारे,,बाळासाहेब जोंधळे,व्हि.जी.सकपाळ, शंकर घोगरे, प्रकाश वानखेडे, बुध्दराज गवळी,सचिन डांगळे,दीपक डिंगणकर ,अनिल साबळे,नटराज मोरे,शंकर घोगरे, विजय कांबळे,कवी दिप,ज्योती गोळे,सुरेखा गायकवाड,प्रविण वाघमारे,मारुती कांबळे, रविंद्र आडके, अनिल खांबे, राजु गडहिरे, विजय कांबळे, मानसी कुंदकर, सुहास अहिरे, शोभा साळवे,कामिनी धनगर, कु.चरण मोकाशी, विश्वास सदाफुले,चेतन जाधव, दीपक आंबटकर, अनिल भालेराव हे कवी सहभागी झाले असून गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,सामाजिक न्याय,संविधान,आरक्षण तर सामाजिक विषयावर कविता सादर केल्या. सहभागी सर्व कवींना मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र व पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कवी मिलिंद जाधव यांनी केले.






