?Breaking.. निरव मोदीला हिंदुस्तानात आणणार, प्रतपर्णाला ब्रिटन न्यायालयांची मंजुरी
पंजाब नॅशनल बँकेचे 14 हजार कोटी बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्यात हिंदुस्थानला मोठे यश मिळाले आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन न्यायालयाने मंजूरी दिली आहे. नीरव मोदी साठी हा मोठा झटका असून आता लवकरच त्याला हिंदुस्थानात आणण्यात येणार आहे. नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.






